Sambhaji Bhide यांचा दौरा रद्द ; पण ४७ जणांवर गुन्हा दाखल 

Sambhaji Bhide News : संभाजी भिडे गुरूजी यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी पदाधिकारी जमा झाले होते.
Sambhaji Bhide News
Sambhaji Bhide News sarkarnama

प्रफुल्ल भंडारी

Sambhaji Bhide News : दौंड शहरातील संभाजी भिडे गुरूजी दौरा रद्द करण्यात आला आहे. शहरातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन ते रायगड येथील प्रस्तावित ३२ मण स्वर्णसिंहासन संबंधी मार्गदर्शन करणार होते. दरम्यान त्यांना उशीर झाल्याने ते दौंड शहरात न येता शहरातील नगर मोरी मार्गे बारामतीच्या दिशेने रवाना झाले .

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी व स्वागतासाठी बेकायदा जमाव जमवणाऱ्या ४७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा समावेश आहे.

Sambhaji Bhide News
MPSC कडून मोठी घोषणा ; गट 'ब'आणि 'क' साठी मेगा भरती , सविस्तर वाचा !

छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिडे गुरूजी यांच्या स्वागतासाठी जमून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष श्रीनाथ उर्फ बाळू ननवरे यांच्यासह एकूण २१ जणांवर १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.                 

संभाजी भिडे शहरात येणार म्हणून भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, आदी पक्ष व संघटनांकडून संभाजी भिडे गुरूजी यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी पदाधिकारी जमा झाले होते.

त्यामुळे पोलिसांनी जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्यासह एकूण २६ जणांवर १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.

पोलिस ठाण्याबाहेर उपोषण..

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी अश्विन वाघमारे, अमित सोनवणे, आदींच्या पुढाकाराने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Sambhaji Bhide News
Eknath Shinde News : मोदींच्या सभेनंतर आघाडीला मोठा धक्का ; बाळासाहेबांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू

संभाजी भिडे शहरात येणार म्हणून भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, आदी पक्ष व संघटनांकडून संभाजी भिडे गुरूजी यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी पदाधिकारी जमा झाले होते.

त्यामुळे पोलिसांनी जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्यासह एकूण २६ जणांवर १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.

पोलिस ठाण्याबाहेर उपोषण..

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी अश्विन वाघमारे, अमित सोनवणे, आदींच्या पुढाकाराने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com