संभाजी भिडे नरमले.. महिला आयोगाला मागितली १० दिवसांची वेळ

Sambhaji Bhide : आधी कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असे वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.
Sambhaji Bhide, Rupali Chakankar Latest News
Sambhaji Bhide, Rupali Chakankar Latest NewsSarkarnama

पुणे : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे कायमच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका महिला पत्रकाराचा आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो असं विधान करत वाद आढावून घेतला होता. भिडेंच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी रान पेटवलं होतं तर सर्वच स्तरातून त्यांच्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, राज्य महिला आयोगाने देखील भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांना खुलासा करण्याबाबत नोटीशी बजावल्या होत्या. मात्र त्या नोटीशींना त्यांनी कुठलेही उत्तर दिले नव्हते. मात्र आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून भिडे हे राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर देणार आहेत. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (Sambhaji Bhide, Rupali Chakankar Latest News)

Sambhaji Bhide, Rupali Chakankar Latest News
हिंदुत्व, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी कायमच मतभेद ; राऊतांच्या वक्तव्याने 'मविआ'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

चाकणकर (Rupali Chakankar) आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, '' महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला १० दिवसांचा अवधी मिळावा, असा विनंती अर्ज भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sambhaji Bhide, Rupali Chakankar Latest News
महाराष्ट्राने समिती स्थापन करताच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, आम्हीही तयार...भाजप आमने-सामने

दरम्यान, महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती.आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला १० दिवसांचा अवधी मिळावा, असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे. आता भिडे नेमकं आपल्या वक्तव्याबाबत महिला आयोगाला काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे मंत्रालयात गेले होते, त्यावेळी त्यांनी एका महिला पत्रकाराला मुलाखत देण्यास नकार देत म्हणाले की,'आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं.त्यांच्या या वक्तव्याविरोधात सर्वच स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com