Kasba By-Election : 'संभाजी ब्रिगेड'ही कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात

Sambhaji Brigade : कसबा विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड लढविणार
Sambhaji Brigade
Sambhaji Brigade Sarkarnama

Kasba By-Election : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते. मात्र, आता सर्वच पक्षाने ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता ही पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेड देखील लढविणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत रंगत वाढणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेडने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडच्या शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sambhaji Brigade
Pathaan : पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक; घोषणाबाजी करत चित्रपटाचे बॅनर फाडले

आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक संभाजी ब्रिगेड लढविणार आहे.

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) निर्णय काही असला तरी कोणाच्या दबावाला बळी न पडता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात आले आहे.

Sambhaji Brigade
Bharat Jodo Yatra : तुटलेला नसताना भारत जोडो कशासाठी? आता हात कुठे जोडणार?

दरम्यान, या बैठकीस प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, सचिव संदीप कारेकर, सिद्धार्थ कोंढाळकर, अभिजित मोरे, महादेव मातेरे, कुमार पवार, माया पवार, व्यंकट मानपिडी, समाधान घोडके, रणजित लंगर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com