सकाळ समूहाच्या 'शेत मार्केट' 'पॉडकास्ट'ला 'वॅन-इन्फ्रा'चे सुवर्णपदक !

शेतमार्केट पाॅडकास्टमध्ये शेती क्षेत्रातील विविध विषयांचा वेध घेतला जातो. त्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना नवा दृष्टिकोन देणारी माहिती मिळते.
Agrovan podcast
Agrovan podcast Sarkarnama

पुणे, महाराष्ट्र- सकाळ माध्यम समूहाच्या शेत मार्केट या पॉडकास्टला दि वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पब्लिशर्स (WAN-IFRA)चे बेस्ट पॉडकास्ट गटातील सुवर्णपदक मिळाले आहे. शेतमार्केट हे शेतीमधले मार्केट इन्टेलिजन्स सांगणारे मराठीतील पहिले पॉडकास्ट आहे.

WAN-IFRA ने २०२२ सालासाठीच्या दक्षिण आशियाई डिजिटल मिडिया पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली. त्यात बेस्ट पॉडकास्ट गटातील सर्वोच्च सन्मानासाठी शेतमार्केट पॉडकास्टची निवड करण्यात आली. WAN-IFRA कडून दिले जाणारे पुरस्कार माध्यम क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. शेतमार्केट या पॉडकास्टला हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अॅग्रोवनच्या या वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल प्रॉडक्टची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

Agrovan podcast
Ncp News: राष्ट्रवादीत 'भावी मुख्यमंत्री'पदाची शर्यत; जयंत पाटलांनंतर आता अजितदादांचे पोस्टर्स!

शेतमार्केट पाॅडकास्टमध्ये शेती क्षेत्रातील विविध विषयांचा वेध घेतला जातो. त्यात मार्केट इन्टेलिजन्स, पीक व्यवस्थापन, उद्योग क्षेत्रातील घडामोडी, धोरणात्मक निर्णय अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्याच प्रमाणे या पॉडकास्टमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मुलाखतीही घेतल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना नवा दृष्टिकोन देणारी माहिती मिळते.

शेतमार्केट पाॅडकास्टच्या या यशाबद्दल सकाळ मिडिया डिजिटल हेड स्वप्नील मालपाठक म्हणाले, ``आम्ही लोकांना शेतीविषयी निर्णयक्षम आणि विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली गेली, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे.`` आमची टीम उच्च गुणवत्तेचा उपयुक्त, माहितीपूर्ण आणि खिळवून ठेवणारा आशय निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेते. हा पुरस्कार म्हणजे त्यांचे परिश्रम आणि समर्पण यांना मिळालेली पावती आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतमार्केट पॉडकास्ट सुरु झाल्यापासूनच त्याला लक्षणीय प्रतिसाद मिळत गेला. राज्यभरातून आणि राज्याबाहेरील मराठी भाषिक लोकांकडून या पॉडकास्टला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि शेतीमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पॉडकास्ट म्हणजे एक मौल्यवान साधन बनले आहे, असेही मालपाठक म्हणाले.

Agrovan podcast
Chinchwad By- Election : पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी पण बंडखोरीची हॅट्रिक करणाऱ्या कलाटेंवर कारवाई नाही...

``आमच्या शेतमार्केट पाॅडकास्टमुळे कृषी पणन उद्योगावर पडलेला प्रभाव, शेतकऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेवर झालेला परिणाम पाहून आम्ही रोमांचित झालो आहेत,`` मालपाठक म्हणाले. आम्ही मौल्यवान आशय तयार करत राहू आणि जाणकारांना आपले ज्ञान आणि दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, अशी आम्हाला आशा वाटते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दक्षिण आशियाई देशांतील नावीन्यपूर्ण, प्रभावी आणि परिणामकारक डिजिटल मिडिया प्रकल्पांचा WAN-IFRA कडून गौरव करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या परीक्षकांचा समावेश असलेल्या समितीकडून पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाते.

WAN-IFRA चा पुरस्कार हा शेतमार्केट पॉडकास्टसाठी एक मैलाचा दगड आहे; या पुरस्कारामुळे आम्ही देत असलेल्या आशयाच्या गुणवत्तेवर मोहोर उमटली आहे, असे मालपाठक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com