हिंदू धर्मासाठी संत तुकोबारायांचं मोठ योगदान : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis| Dehu| पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत.
हिंदू धर्मासाठी संत तुकोबारायांचं मोठ योगदान : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis| Dehu|

पुणे : 'संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून जगाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचं काम केलं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) देखील आज रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. हिंदू (Hindu) धर्मासाठी संत तुकोबारायांचं मोठ योगदान असल्याची भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (Devendra Fadanvis latest news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूत जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदीराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ''समाजात ज्या काळात नैराश्य होते, तेव्हा समाजाला भागवतधर्माच्या मार्गावर नेण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलींनी केले आणि त्यावर कळस चढविण्याचे काम जगदगुरु तुकाराम महाराज यांनी केले. माऊलींनी जो अखिल विश्वाचा विचार आपल्याला दिला, त्याच मार्गावर आज देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadanvis| Dehu|
मोदींच्या कार्यक्रमात फडणवीसांचं भाषण पण अजितदादा बोललेच नाहीत!

कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला मदत करण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्त्वात झाले. वारकर्‍यांचा धर्म काय आहे? सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास-सबका प्रयास! वारकर्‍यांच्याच या ब्रिदावर आज देशाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज वारकर्‍यांच्या भूमिकेतूनच काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे खासदार गिरीश बापट नरेंद्र मोदीचे पुणे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरमधून देहूकडे रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी शिळा मंदीर तसेच इंद्रायणी नदी तसेच या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

तर, आज देहूतल्या पवित्र भूमीवर येण्याचे भाग्य मिळाले. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे. संत तुकाराम महारांजांच्या पालखी मार्गी तीन ट्प्प्यात, आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग पाच टप्प्यात होणार, ३५० किलोमीटरचा पालखी मार्ग, ११ हजार कोटींचा निधीची तरतुद कऱण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in