‘साहेब, तुम्ही दोनवेळा माझ्या स्वप्नात आलात’ : तरुणाच्या प्रश्नावर पवारांचे मिश्किल उत्तर...

कोण म्हणतंय मी म्हातारा झालोय. मी काय म्हातारा बितारा झालेलो नाही, असे उत्तर पवार यांनी दिले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आज (ता. २४ ऑक्टोबर) पुरंदर (Purandhar) तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. महत्वाचे म्हणजे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तरेही दिली. एका तरुण शेतकऱ्याने पवारांना ‘मागील दहा वर्षांत तुम्ही दोन वेळा माझ्या स्वप्नात आला होता’ असे सांगितले. त्यावर पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ('Saheb, you came twice in my dream': Pawar's answer to youths question)

पुरंदरमध्ये एका शेतकरी कार्यक्रमाला आलेल्या पवारांनी पस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. अनेकांचे प्रश्न समजून घेतले. त्यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना या वयात तुम्ही आता बााहेर फिरू नका, तुम्ही फक्त रिमोट चालवा. आमचं काय चुकलं तर आम्हा सांगत जावा, असे सांगितले. त्यावर पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ते म्हणाले की कोण म्हणतंय मी म्हातारा झालोय. तुम्ही काय बघितलं. मी काय म्हातारा बितारा झालेलो नाही, असे उत्तर दिले. त्यावर एकच हशा पिकला. स्वत पवार यांनाही यावेळी हासू आवरले नाही.

Sharad Pawar
हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा : वैभव नाईकांचे राणेंना आव्हान

एक तरुण शेतकरी त्यानंतर बोलायले उभा राहिला. तो म्हणाला की, साहेब नमस्कार. मी जेजुरी ग्रामीणच्या वतीने बोलत आहे. दिवाळीच्या प्रथम तुम्हाला शुभेच्छा. साहेब, मागील १० वर्षांत तुम्ही दोन वेळा माझ्या स्वप्नात आला होतात. त्यानंतर तो तरुण शेतकरी आपल्या समस्या सांगू लागला. पण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्याला मध्येच थांबवत त्यांनी खास शैलीत फिरकी घेतली. ते स्वप्न मध्यरात्री पडलं होतं की पहाटेच्या वेळी? असा प्रश्न त्यांनी विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर संबंधित तरुणाने आपली समस्या सांगितली.

Sharad Pawar
साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडेंसारखा खमका अधिकारी नेमा : पंढरपूरच्या ऊस परिषदेत ठराव

याचवेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, वीज, पाणी, शेततळ्याचे अनुदान यासंदर्भातील प्रश्न शेतकऱ्यांनी पवारांपुढे मांडले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीबद्दल बोलताना पवार म्हणाले की, मुसळधार पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण सरकारकडून राबविले जात नाही. मी स्वतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देणार आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com