'ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी...सर आली धावून भाजपा ऑफिस गेले वाहून'

काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांची भाजपवर टीका
Sachin Sawant
Sachin Sawantsarkarnama

Sachin Sawant : पुणे : गणपती विसर्जनानंतर पुण्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पुणे (Pune) शहराच्या विविध भागात पाणी चाचले होते. याचा फटका अनेक नागरिकांना बसला. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. यामध्ये पुणे महापालिका भवन परिसरात भाजपचे (BJP) कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रणाणात पाणी साचले होते. त्यावरुन काँग्रेसने (Congress) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Sachin Sawant
शिंदे-फडणवीस सरकारच्या उदासीनतेमुळे प्रकल्प गुजरातमध्ये; मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याची चर्चा

काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत भाजपवर जोरादर निशाणा साधला आहे. सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटेल आहे की ''येरे येरे पावसा, पुणे पालिकेचा खाल्ला पैसा... पैसा मिळाला मोठा, भाजपा ठरला खोटा... ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी...सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!, असा टोला सावंत यांनी लगावला आहे. सावंत यांनी एक व्हिडीओ ही ट्वीट केला आहे. त्यामध्ये भाजपच्या ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत आहे.

Sachin Sawant
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला मग महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहीहंड्या फोडायच्या का ?

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदी पात्रामध्ये १ हजार ९२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून ३ हजार ४२४ करण्यात आला. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नदीपात्रात उतरु नये. तसेच नदीपात्रात काही साहित्य अथवा जननावरे असल्यास हलविण्यात यावीत, असे आवाहन धरण प्रशासनाने केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in