सचिन अहिरांनी केली नांदगावकरांवर मात: ओमराजे निंबाळकर ठरले हिरो

सरकारनामाच्या क्रिकेटनामा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय खेळाडूंची मैत्रीपूर्ण सामना झाला.
Sachin Ahir, Bala Nandgaonkar
Sachin Ahir, Bala Nandgaonkarsarkarnama

पुणे : सरकारनामाच्या क्रिकेटनामा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय खेळाडूंची मैत्रीपूर्ण सामना झाला. शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या नेतृत्वात टीम बी मैदानात उतरली. यात खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), सुदर्शन जगदाळे, संजय मोरे, अतुल लोंढे (Atul Londhe), उल्हास कदम, विपुल गायकवाड, सचिन चिखले अशा सर्वपक्षीय खेळाडूंचा समावेश होता.

बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात टीम ए मैदानात उतरली. यामध्ये आमदार अमित झनक, खासदार संजय जाधव, गजानन काळे, निरंजन अडगळे, बाबासाहेब कांबळे, अनिकेत तटकरे, सागर बालवडकर, अशा सर्वपक्षीय खेळाडूंचा भरणा होता. सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या टीमची जोरदार फटकेबाजी करत दोन गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावा केल्या. बाळा नांदगावकर यांच्या टीमला विजयासाठी ६४ धावांचे टार्गेट दिले.

Sachin Ahir, Bala Nandgaonkar
Cricketnama : मनसेने केला 'आप'चा झाडून पराभव; बाबू वागस्करांची जोरदार बॅटींग

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या टीमनेही जोरदार बॅटींग केली. मात्र, सचिन अहिरांच्या टीमने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे ते या सामन्याचे हिरो ठरले. यामध्ये काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी जोरदार फिल्डिंग केली. तर अनिकेत तटकरे यांनी मोठी मेहनत घेतली. बॅटिंग, बॅालिंगमध्ये त्यांनी चांगले प्रदर्शन केले. त्यांनी शेवटपर्यंत आपल्या विजयाच्या आशा पल्लावीत ठेवल्या. या अतितटीच्या सामन्यात आहिर यांनी दणदणीत विजय मिळवला.

Sachin Ahir, Bala Nandgaonkar
मनसेने आपला २२ धावांवर रोखले; अजय शिंदे अन् साईनाथ बाबर यांची जोरदार गोलंदाजी

दरम्यान, राजकारणता वादळ उठवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सरकारनामाच्या मैदानावरही प्रतिस्पर्धी आपचा झाडून पराभव केला. त्यामुळे या सामन्यातील दुसऱ्या दिवसीच्या पहिलेच मैदान मनसेने गाजवले. मनसेने जोरदार बॅटींग केली. बाबु वागस्करांनी जोरदार फटकेबाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये विजयाकडे त्यांनी वाटचाल केली. बाबु वागस्कर सामनावीर ठरले. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते बाबु वागस्करांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विजयानंतर मनसेने जोरदार जल्लोष केला. बाबु वागस्करांना खांद्यावर घेत मनसेने विजयोत्सव केला. मनसेचा हा विजयोत्सव पाहण्साठी स्वत मनसेचे नेते बाळा नांदगावर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com