रुपाली ठोंबरे-पाटलांचं ठरलं..घड्याळ बांधणार..

राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निकटच्या मानल्या जाणाऱ्या रुपाली यांनी अचानक पक्ष सोडण्याचा पवित्रा घेतल्याने मनसे, पुण्याच्या राजकीय वुर्तळात खळबळ उडाली.
रुपाली ठोंबरे-पाटलांचं ठरलं..घड्याळ बांधणार..

मुंबई: पक्षांतर्गत कुरघोड्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सोडलेल्या माजी नगरसेविका आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष रुपाली ठोंबरे- पाटील (RUPALI THOMBARE PATIL) यांनी राजीनामा दिला आहे. त्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका, विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांत पक्षातील काही नेत्यांनी दगाफटका दिल्याने नाराज राहिलेल्या रुपाली यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्यपदासह आपल्याकडच्या जबाबदारीचा राजीनामा दिला. पक्षात विशेषत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निकटच्या मानल्या जाणाऱ्या रुपाली यांनी अचानक पक्ष सोडण्याचा पवित्रा घेतल्याने मनसे, पुण्याच्या राजकीय वुर्तळात खळबळ उडाली. राजीनाम्याचे ताजे कारण काय, त्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, त्याचा मुहूर्त ? याची चर्चा रंगली आहे.

राज हे आज पुण्यात दाखल झाले आहेत. रुपाली यांना मानणारे काही नेते त्यांच्या संपर्कात जाऊन समजूत काढण्याची शक्यता होती. परंतु, पक्षातर्गत मुस्कटदाबीच्या तक्रारीवर वरिष्ठांनी मार्ग न काढल्याने राजीनामा आणि नव्या पक्षाचा झेंडा हातात घेण्यावर रुपाली पाटील ठाम आहेत.

राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात आणि पत्रकार परिषदेत रुपाली यांच्या राजीनाम्याचे काही पडसाद उमटणार का, याकडे लक्ष लागून आहे. महापालिका निवडणुकांसाठी राज आणि पक्षातील काही नेत्यांनी आतापासून जोरदार तयारी चालविली असतानाच रुपाली यांचा राजीनामा हा मनसेसाठी पहिला धक्का मानला जात आहे. रुपाली यांच्यासोबत इतर काही माजी नगरसेवक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांआधी मनसेचे 'आउट गोईंग' सुरूच राहणार की राज स्वत: लक्ष घालून नाराजांची समजूत काढणार का, हेही महत्त्वाचे असेल.

रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अटकळ बांधली जात आहे. या दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांना त्या मंगळवार दुपारीच भेटल्या होत्या. त्यात रुपाली यांच्यासारख्या आक्रमक महिला नेत्याला शिवसेनेत घेऊन ताकद वाढविण्याची प्रयत्न या पक्षाच्या मुंबईतील नेत्यांचा आहे. युवा सेनेचे प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून रुपाली यांनी मुंबईत बोलवून शिवसेनेत येण्याची 'ऑफर' दिली होती. तुर्तास नव्या पक्ष निवडला नसल्याचे सांगून रुपाली यांनी युवासेना आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करून सह्याद्री अतिथिगृहातून काढता पाय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com