वसंत मोरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग; रुपाली ठोंबरे चर्चेला रवाना

Vasant More | MNS | Rupali Thombre Patil : शिवसेनाही वसंत मोरेंच्या संपर्कात
Vasant More- Rupali thombare patil
Vasant More- Rupali thombare patil sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून तडकाफडकी हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मनसेतील त्यांच्या जुन्या सहकरी आणि सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. ठोंबरे-पाटील राष्ट्रवादी प्रवेशाचे निमंत्रण घेऊन मोरेंच्या भेटीला गेल्या आहेत. यावेळी त्यांनी मोरे हे राष्ट्रवादीत येतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे ठोंबरे-पाटील आणि मोरे यांच्यातील भेट आणि चर्चेकडे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील ठोंबरे यांनीही मनसेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या म्हणाल्या, मनसेतील नेत्यांच्या सातत्यांच्या खेळ्यांमुळे वसंत मोरे यांचे पद गेले आहे. मोरे यांनी संघटना आणि लोकांसाठी चांगले काम केले आहे. त्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस येतील. दरम्यान, राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेकडूनही मोरे यांना ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते आता नेमके कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार आणि आपली नाराजी कोणत्या शब्दांत उघड करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Vasant More- Rupali thombare patil
"मी तर कधीपासून तुझाच मावळा" : वसंत मोरेंकडून बाबर यांचे अभिनंदन!

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुंबईसह काही ठिकाणी मनसैनिकांनी या आदेशाचे पालन केले होते. मात्र पुण्यात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

Vasant More- Rupali thombare patil
‘भोंग्याचा पहिला बळी’; वसंत मोरेंची हकालपट्टी : पुणे मनसेचे नवे अध्यक्ष साईनाथ बाबर

मागील दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी आज मुंबईत बोलावले होते. यात बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि साईनाथ बाबर यांना 'शिवतीर्थ'वर पाचारण केले होते. यावेळी राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे आज दुपारी जाहीर करण्यात आले.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ''सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com