By-Election : एकीकडे मतदान तर दुसरीकडे भाजप- राष्ट्रवादीमध्ये जुंपली; रुपाली पाटलांची रासनेंविरोधात तक्रार

Pune : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी समोर आल्या
Rupali Patil Thombre and Hemant Rasane
Rupali Patil Thombre and Hemant RasaneSarkarnama

Pune Bypoll election : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज (दि.26 फेब्रुवारी) मतदान पार पडलं. कसबा- चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचे मतदान अत्यंत संथगतीने झाले. त्यामुळे आश्चर्चही व्यक्त करण्यात येत आहे.

आज दिवसभरात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी समोर आल्या. यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

Rupali Patil Thombre and Hemant Rasane
Kasaba By-Election : भाजप उमेदवार अडचणीत;आचारसंहितेचा भंग, कारवाई होणार?

हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मतदान करताना थेट मतदान केंद्रात पक्षचिन्ह असलेला रुमाल त्यांनी वापरल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे.

Rupali Patil Thombre and Hemant Rasane
By Election : चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीत आतापर्यंत काय-काय घडलं? दोन गटात हाणामारी ते...

कसबा निवडणूक निरीक्षकांना याबाबतचे पत्र लिहित रुपाली पाटील यांनी रासने यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. रासने यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचे पत्र रुपाली पाटील यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केले आहे. दरम्यान, निवडणूक अधिकारी आता यावर काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

complaint
complaint

दरम्यान, कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com