Rahul Shewale : शेण खाता अन् दाऊदशी संबंध जोडता; शेवाळेंना ठोंबरेंनी सुनावले

Rahul Shewale News : आरोप-प्रत्यारोपावरून राजकारण तापलं
Rahul Shewale and Rupali Patil-Thombare
Rahul Shewale and Rupali Patil-ThombareSarkarnama

Rahul Shewale News : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे राजकारण तापलं असून राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. ''माझं राजकीय आयुष्य खराब करण्याचा हा सर्व प्रयत्न असून त्या महिलेचे पाकिस्तानशी संबध आहे'', असा दावा शेवाळेंनी केला आहे.

आता यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. ''राहुल शेवाळे हे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी आणि पाकिस्तानशी संबंध जोडतात. शेवाळेंना असं बोलायला लाज वाटली पाहिजे', असं त्या एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हणाल्या.

Rahul Shewale and Rupali Patil-Thombare
Ram Satpute : '' प्राजक्त तनपुरे मटक्यावाले, वाळुमाफिया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक...?''; राम सातपुतेंचा घणाघात

त्या म्हणाल्या की, ''राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे. मात्र राहुल शेवाळे म्हणतात की त्या महिलेचे पाकिस्तानशी आणि दाऊदशी संबंध आहे. तर मग राहुल शेवाळे आणि त्या महिलेचे वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ शेवाळेंनी दाऊदतच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली असा अर्थ घ्यायचा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Rahul Shewale and Rupali Patil-Thombare
Amol Mitkari : 'त्या' व्हिडिओची अमोल मिटकरी करणार उद्या पोलखोल..

''शेवाळे हे त्या महिलेवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत असतील तर राहुल शेवाळे यांनी देशाच्या विरोधात काम केलं असून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे'', असं म्हणत राहुल शेवाळे यांच्यावर घणाघाती टीका केली.

पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले?

''माझं राजकीय आयुष्य खराब करण्याचा हा सर्व प्रयत्न आहे. माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानशी कनेक्शन आहे. तर दाऊदशी संबंध असलेल्या महिलेला युवा सेनाप्रमुख पाठीशी घालत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएच्या माध्यमातून करावा'', अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com