रूपाली चाकणकरांनी माझा फोनच उचलला नाही : सुषमा अंधारेंचा आरोप

नोटिसा प्रेमापत्रासारख्या काढू नका....
Rupali Chakankar-Sushma Andhare
Rupali Chakankar-Sushma AndhareSarkarnama

पुणे : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माझ्याविषयी जे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी मी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना दोन ते तीनवेळा फोन केला होता. मात्र, चाकणकर यांनी माझा फोन उचलला नाही, असा आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. (Rupali Chakankar did not pick up my phone : Sushma Andhare's allegation)

पुण्यात सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर वरील आरोप केले आहेत. शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात गेल्यानंतर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर पाटील यांनी सुषमा अंधारे यांना ‘नटी’ असे संबोधले होते. त्या प्रकरणानंतरच त्यांनी चाकणरांना फोन केल्याची शक्यता आहे.

Rupali Chakankar-Sushma Andhare
संभाजी भिडे आणि सुधा मुर्तींच्या भेटीबद्दल खुलासा करणारी पोस्ट डिलीट; कारण काय?

अंधारे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी मी रूपाली चाकणकर यांना फोन केला होता. मात्र, त्यांनी माझा फोनच घेतला नाही.

Rupali Chakankar-Sushma Andhare
सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे भाष्य : ‘सत्तारांचं बोलणं चुकीचंच; पण....’

अंधारे म्हणाल्या की, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भारतीय जनता पक्ष काय कारवाई करणार आहे. त्याचबरोबर महिला आयोगानेही सिल्केटिव्हनेस दाखवू नये. महिला आयोगाने केवळ सत्तार यांनाच नव्हे; तर गुलाबराव पाटील यांनाही नोटीस काढणे गरजेचे आहे. ज्या जिल्ह्यात सत्तार आणि पाटील यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत, त्या ठिकाणचे पोलिस त्यांच्याविरोधातील एफआर नोंदवून घेत नाहीत, हे कोणाच्या आशीर्वादाने होत आहे, हेसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पाहिजे.

Rupali Chakankar-Sushma Andhare
अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा; अन्यथा.... : राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी आक्रमक

आधी संभाजी भिडेंच्या विरोधात नोटीस काढली असती तर गुलाबराव पाटील यांचे प्रकरण झाले नसते. तसेच, गुलाबराव पाटील यांना नोटीस काढली असती, तर पुढचे प्रकरण घडले नसते. नोटिसा प्रेमापत्रासारख्या काढू नका, काही तरी कारवाई झाली पाहिजे, असेही सुषमा अंधारे यांनी सूचविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com