दोन कोटींची खंडणी मागणारा ‘आरटीआय’ कार्यकर्ता पोलिसांच्या जाळ्यात

नगर जिल्ह्यात रस्त्याचे काम करणाऱ्या एका बांधकाम ठेकेदाराकडे त्याने ही खंडणी मागितली होती.
Crime pune
Crime punesarkarnama

पुणे : दोन कोटी रूपये द्या अन्यथा दंड करायला लावतो, अशी धमकी देणाऱ्या माहिती आधिकार कार्यकर्त्याला (Right to Information activist) पुणे पोलिसांनी (Pune Police) मंगळवारी अटक केली आहे. दोन कोटींपैकी २५ लाख रूपये घेताना त्यास रंगेहाथ पडण्यात आले आहे.

Crime pune
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंना धक्का देत सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर

नगर जिल्ह्यात रस्त्याचे काम करणाऱ्या एका बांधकाम ठेकेदाराकडे त्याने ही खंडणी मागितली होती.दत्तात्रेय गुलाबराव फाळके (वय ४६, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. संबंधित ठेकेदाराने याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचून २५ लाख रूपये घेताना मंगळवारी फाळके यास अटक करण्यात आली.

Crime pune
खासदार हेमंत गोडसे राजीनामा द्या; पुन्हा निवडून येऊन दाखवा!

तक्रारदार बांधकाम ठेकेदार आहेत. नगर जिल्ह्यात जामखेड परिसरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी ठेकेदारांच्या कनपीच्यावतीने काम करण्यात येत आहे. या कामाच्या संदर्भाने आरोपी फाळके ठेकेदाराला भेटला. तुमच्या कंपनीकडून बेकायदा उत्खनन करण्यात आले आहे. परवानगी घेण्यात आल्या नाहीत तसेच उत्खननाचे शुल्क भरण्यात आले नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी फाळकेने त्यांना दिली. आपण माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची बतावणी करून फाळके याने ठेकेदाराला धमकावण्यास सुरवात केली.

फाळकेच्या त्रासाला कंटाळून ठेकेदाराने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला. ठेकेदाराने खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी फाळकेला कदम प्लाझा इमारतीजवळ बोलावले होते. त्यावेळी ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी घेताना फाळकेला पकडण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com