RSS Dasara Melava : संघाच्या इतिहासात हे पहिल्यादांच घडतयं ; विजयादशमी उत्सवात महिलेला मोठा मान

Santosh Yadav : टीकाकारांनी अनेकदा RSS वर 'पुरुष वर्चस्व' असल्याची टीका केली. पुरुषांचा सहभाग असल्याने संघावर अनेक राजकीय पक्षांकडून निशाणा साधला जातो.
RSS Dasara Melava latest news
RSS Dasara Melava latest newssarkarnama

पुणे : राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेत वाद रंगला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा दसरा मेळावा सगळ्याचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संघाच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. हे वर्ष आठवणीत राहावे, याउद्देशाने पहिल्यांदा ऐतिहासिक असा निर्णय संघाने घेतला आहे. (RSS Dasara Melava latest news)

काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह आरएसएसच्या टीकाकारांनी अनेकदा RSS वर 'पुरुष वर्चस्व' असल्याची टीका केली. पुरुषांचा सहभाग असल्याने संघावर अनेक राजकीय पक्षांकडून निशाणा साधला जातो. ही प्रतिमा बदलण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदाच्या दसरा मेळाव्यात संतोष यादव यांना निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.

नागपूर (Nagpur) येथील विजयदशमी उत्सवात (RSS Vijayadashami celebration) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर्षी गिर्यारोहक, पद्मश्री संतोष यादव (Santosh Yadav)यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत संघाने समाज माध्यमावर निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. या निमंत्रण पत्रिकेची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये आहे.

RSS Dasara Melava latest news
Congress President : अखेर ठरलं, राहुल गांधींनाच अध्यक्ष करा ; बैठकीत प्रस्ताव मंजूर

शिंदे-फडणवीस सरकारच्या हालचाली लक्षात घेता यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होण्याची शक्यता कमीच आहे. काहीही करून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्येच होईल, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला असला तरी शिंदे सरकार शिवसेनेला सहजी परवानगी देणार नाही, असे चित्र सध्या आहे. तर दुसरीकडे आरएसएसच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच महिला दिसणार आहे.

कोण आहेत संतोष यादव...

  • संतोष यादव या गिर्यारोहक आहेत.

  • त्यांचा जन्म जानेवारी 1969 मध्ये हरियाणात झाला

  • मे 1993 मध्ये त्यांनी एव्हरेस्टवर चढाई करण्यात यश मिळवले.

  • 1994 मध्ये पुन्हा एव्हरेस्टवर चढाई करण्यात यश मिळवले

  • माऊंट एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला.

  • यादव यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • 54 वर्षीय संतोष यादव सध्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसात अधिकारी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in