RSS ने जागवल्या चाळीस वर्षांपूर्वींच्या त्या आठवणी...

RSS News : बाळासाहेब देवरस यांच्यासह संघाचे अनेक केंद्रिय अधिकारी या शिबिरात उपस्थित होते.
RSS News
RSS News sarkarmama

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्यात (pune)भरवलेल्या 'प्रांतिक शिबिरा'ला आज शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने विविध आठवणींनी उजाळा देण्यात आला आहे. निमित्ताने RSSच्या स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणी जागवल्या जात आहेत. (RSS News update)

पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर १४, १५, १६ जानेवारी १९८३ असे तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस हजार संघस्वयंसेवक उपस्थित होते.

तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह संघाचे अनेक केंद्रिय अधिकारी या शिबिरात उपस्थित होते. शिबिरात १४ जानेवारी रोजी झालेल्या मकरसंक्रमण उत्सवाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक'स्वामी'कार रणजित देसाई हे होते.

RSS News
Satyajit Tambe News : तांबेंचं 'पितळ' उघड ; अजितदादांनी केला थोरातांबाबत मोठा गौप्यस्फोट

'हिंदू सारा एक...'

डॉ. अरविंद लेले यांनी लिहिलेले 'हिंदू सारा एक...' हे गीत या शिबिरात स्वयंसेवकांनी गायले. संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनी ते व्यासपीठावरून गायले होते आणि प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी हे गीत स्वरबद्ध केले होते. पुणे ,पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा, संभाजीनगर, मराठवाडा, नाशिक आणि खान्देश या भागातील बावीसशे चाळीस गावांमधून या शिबिरासाठी संघस्वयंसेवक आले होते, अशी माहिती संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी दिली.

पावणेदोन लाख गुळाच्या पोळ्या

या शिबिराला आलेल्यांना गुळाच्या पोळ्यांचे भोजन देण्यात आले होते. पुण्यातील घराघरांमधून या पोळ्यासंकलित केल्या होत्या. या उपक्रमाला पुणेकर माता-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि सुमारे पावणेदोन लाख गुळाच्या पोळ्या शहरातून संकलित झाल्या होत्या, असेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.

तीन लाख नागरिकांनी भेट

संघाकडून चालवल्या जाणाऱ्या सेवाकार्यांचे दर्शन घडवणारे चारशे चित्रांचे 'संघदर्शन' हे प्रदर्शन, शिवधनुष्याच्या आकाराचे प्रवेशद्वार, पृथ्वीच्या आकाराचे आणि त्यावर शेषशाही नागाने फणा धरलेले दोन मजली भव्य व्यासपीठ ही या शिबिराची आकर्षणे ठरली होती. 'संघदर्शन' प्रदर्शनाला तीन दिवसात तीन लाख नागरिकांनी भेट दिली होती, अशीही माहिती डॉ. दबडघाव यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com