Sharad Pawar Retirement: पवारांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी, आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज...

Mahadev Jankar Reaction On Sharad Pawar Retirement: पवारांनी राजकारणात राहावं..
mahadev jankar,  sharad pawar
mahadev jankar, sharad pawarSarkarnama

Mahadev Jankar Reaction on Sharad Pawar Decision: राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझा सांगाती…या पुस्तकाचा प्रकाश सोहळा काल (मंगळवारी) मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पार पडला.

या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.

पवारांच्या निर्णयावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पवारांच्या या निर्णयावर भाष्य केले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहावं, आम्हाला शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर शरद पवार साहेबांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी आहे,"

mahadev jankar,  sharad pawar
Sharad Pawar Announced Retirement : शरद पवार यांची मोठी घोषणा अन् नेत्यांना अश्रु अनावर

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टि्वट करीत प्रतिक्रिया दिली आहे. माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत , असं ट्वीट राणे यांनी केलं.

mahadev jankar,  sharad pawar
Sharad Pawar निर्णय मागे घ्या, पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे झळकले बॅनर ; राजीनामा सत्र..

मनसे आमदार राजू पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे .शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर राजकीय घडोमोडींना वेग आला आहे.

शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी फेरविचार करावा, असा सल्ला दिला आहे.अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असेल, अशी सावध प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

mahadev jankar,  sharad pawar
Sharad Pawar News : शरद पवारांच्या निर्णयावरुन पदाधिकारी आक्रमक ; सोलापुरात NCP ने घेतला 'हा' निर्णय

"लोक माझा सांगाती.." या कार्यक्रमासाठी नवाब मलिक यांच्या दोन्ही मुलींनी उपस्थिती लावली होती. नवाब मलिक यांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे पवारांनी अचानक घोषणा केल्यानंतर नवाब मलिकांच्या सना मलिक शेख आणिनिलोफर मलिक खान या दोन्ही मुलींना रडू कोसळलं.

"आम्ही नवाब मलिक यांच्या मुली आहोत. आपल्याला विनंती करायला आलो आहोत की, आमच्या वडिलांच्या गैरहजेरीत तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात. आपण कृपया करुन आपला निर्णय मागे घ्या आणि आमच्यासोबत आपण जसे उभे आहात तसेच उभे राहा," असं मलिक यांच्या मुली म्हणाल्या.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com