Chinchwad By Election : अश्विनी जगतापांच्या विजयासाठी तानाजी सावंतांच्या ‘नेटवर्क’ने बजावली मोलाची भूमिका

चिंचवड मतदारसंघात राबविलेली प्रचार यंत्रणा व मराठवाड्यातील स्थलांतरित मतदारांना आपलेसे करीत राबविलेले नेटवर्क कामी आले.
Ashwini Jagtap-Tanaji Sawant
Ashwini Jagtap-Tanaji Sawant Sarkarnama

विक्रम पाठक

सोलापूर : चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विजयी ठरल्या असल्यातरी त्यांच्या या विजयात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी पडद्यामागून मोठी भूमिका पार पाडली. त्यांनी चिंचवड मतदारसंघात राबविलेली प्रचार यंत्रणा व मराठवाड्यातील स्थलांतरित मतदारांना आपलेसे करीत राबविलेले नेटवर्क कामी आले. त्यासोबतच या मतदारसंघात असलेले त्यांचे जेएसपीएम या संस्थेच्या नेटवर्कचा फायदा त्यांना झाला. त्यांच्या या कामगिरीमुळेच याठिकाणी भाजपला एक हाती विजय मिळवणे शक्य झाल्याने आरोग्य मंत्री सावंत हेच विजयाचे शिल्पकार ठरले, असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. (Role of Health Minister Tanaji Sawant was important in the victory of Chinchwad)

आरोग्य मंत्री सावंत व जगताप यांचे नातेसंबंध सर्वश्रुतच आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या दोन्ही मुली त्यांच्या सुना आहेत. त्यामुळे या कुटुंबाचे पूर्वीपासूनचे नातेसंबंध आहेत. या दोन्ही कुटुंबाचे बरेचसे नातेवाईक या भागात असल्याने प्रचार करीत असताना त्याचा मोठा त्यांना फायदा झाला. त्याशिवाय आरोग्य मंत्री सावंत यांनी २०१९ साली भूम, परंडा, वाशी या मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणुकीत यश मिळवले. त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता.

Ashwini Jagtap-Tanaji Sawant
Pandharpur Politics : विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांची परिचारकांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी!

निवडणुकीसाठी यंत्रणा कशी राबवायची याची माहिती त्यांना असल्याने त्यांनी चिंचवड मतदारसंघात असलेल्या मराठवाड्यातील स्थलांतरित मतदारांवर लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये जवळपास १५ ते २० हजार मतदार भूम, परंडा, वाशी या मतदारसंघातील मतदार इकडे कामानिमित्त स्थलांतरित झाल्याचे लक्षात आले. या सर्व सुमारे १५ ते २० हजार मतदारांपर्यंत पोचत त्यांना आपलेसे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र अशी यंत्रणा राबवली.

त्यांच्या जेएसपीएम या संस्थेचे मोठ्या प्रमाणात पुणे, पिंपरी येथे कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या चिंचवड मतदारसंघात असलेल्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांच्या नेटवर्कचा फायदा करून घेत सुमारे दहा हजार मतदारांचे मतदान करून घेतले. अशा सुमारे ३० हजार मतदानाची आघाडी जगताप यांना मिळवून देण्यात आरोग्यमंत्री सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय त्यांनी भूम, परंडा, वाशी या मतदारसंघातील शिवसेनेचे संघटनात्मक पदाधिकारी व यंत्रणेला प्रचार कार्यात उतरवून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्याचाही फायदा जगताप यांना झाला.

Ashwini Jagtap-Tanaji Sawant
Ashok Chavan News : 'अशोक चव्हाणांना एवढी कशाची भीती वाटतेय...? त्यांची ED, CBIकडे तक्रार झालीय का?'

कलाटेंची उमेदवारी ठेवली कायम

चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत झाल्यास भाजपचा मार्ग सुकर ठरेल अशा स्वरूपाचे आखाडे त्यांनी बांधले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी लागलीच हे हेरून राहुल कलाटे यांची उमेदवारी कायम कशी राहील यासाठी प्रयत्न केले.

Ashwini Jagtap-Tanaji Sawant
Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

कसब्यात भाजपने मागितली नाही मदत

कसबा मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्या ठिकाणीही आरोग्यमंत्री सावंत यांची मोठी यंत्रणा कार्यरत होती, मात्र भाजपकडून त्यांच्याशी संपर्क साधला गेला नाही. अन्यथा त्या ठिकाणी त्यांची मोठी मदत झाली असती, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com