अजितदादांच्या कामाचा धडाका अन् रोहित पवार म्हणाले, विरोधकांचे डिपॉझिट उगीच जप्त होत नाही!

दादांचे नेहमीच काम बघितलेल्या रोहित पवारांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भुरळ पडली
अजितदादांच्या कामाचा धडाका अन् रोहित पवार म्हणाले, विरोधकांचे डिपॉझिट उगीच जप्त होत नाही!
Ajit Pawarsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या संदर्भात कौतुक केले आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळत आहे. हेही माझे भाग्यच आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.

अजितदादा आज (ता. १० ऑक्टोबर) बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत आज रोहित पवारही होते. अजितदादांच्या नियमानुसार सकाळीच म्हणजे सहाच्या ठोक्याला त्यांनी काम सुरु केले. दादांचे नेहमीच काम बघितलेल्या रोहित पवारांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भुरळ पडली. त्या संदर्भात त्यांनी आपली भावना एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात सीटी स्कॅन विभागाचे लोकार्पण आज पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Ajit Pawar
पुणे जिल्ह्यात दुभंगलेली महाविकास आघाडी, पिंपरीत एकवटली

फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणले, ''भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार दादा! गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचे डिपॉझिट उगीच जप्त होत नाही. आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन त्यांनी आढावा बैठक घेतली.

Ajit Pawar
पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे अन् गृहमंत्री म्हणाले...

विकास कामे करताना दादांचे त्यावर बारकाईने लक्ष असते. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचे व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझे भाग्यच आहे.''

Related Stories

No stories found.