पार्थ पवारांच्या प्रचारासाठी मी सर्वात प्रथम जाईल...

मावळ (Maval) लोकसभा मतदार संघावरुन राजकारण तापले आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

पिंपरी : शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Shirang Barne) खासदार असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ २०२४ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यासाठी शिवसेनेने (Shivsena) सोडावा आणि बारणेना राज्यसभेवर पाठवावे, अशी विनंतीवजा मागणी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने केली होती. त्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. त्यावर खासदार बारणे यांनी पक्षाच्या शिवसंवाद यात्रेत शरसंधान केले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर भाष्य केले आहे.

Rohit Pawar
राणे, विखे, हर्षवर्धन, वाघ यांना निवडणूक रचनेत स्थान नाही... भाजपसाठी अजून ते उपरेच?

रोहित पवार पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार यांना पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली. ते म्हणाले, तुम्हाला पार्थ पवार यांचा फोन आला होता का? अजितदादांनी काही वक्तव्य केले का? किंवा पवारसाहेब काही म्हणाले का? काही लोक प्रस्ताव मांडत असतात. ते प्रेमापोटी बोलत असतात.

महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. त्याच्यामध्ये अजितदादा आहेत. पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आहे. त्यानुसार पार्थ यांना उमेदवारी मिळाली तर मग ती राज्यसभेची असू द्या, नाहीतर लोकसभेची असू द्या, तिथे जर प्रचार करण्याची संधी मला मिळाली तर सर्वात पहिले तिथे मी जाईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Rohit Pawar
मोठी बातमी : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले; मास्कपासूनही मुक्ती

शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यावर रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांना अनेक नेते भेटत असतात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही त्यांना भेटत असतात. मला असे वाटते की आज एखाद्या पदापेक्षा सर्वांनी चर्चा करुन काही चुकीचे घडत असेल तर त्या विरोधात एकत्र आले पाहिजे. भाजपकडून संविधानाला तडा देण्याचे काम केले जात असेल तर एकत्र येताना कोणत्याही अटी घाटल्या नाही पाहिजे. सर्वांनी एकत्र येवून काम करावे, एखाद्या पक्षाला पुढे जावे लागेल. एखाद्या पक्षाला मागे यावे लागले, मात्र, सर्वांनी एकत्र यावे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com