चंद्रकातदादांना रोहीत पवार म्हणाले; छोटे मन से कोई बडा नही होता…

मेट्रोच्या कामाच्या श्रेयाची पवारांना गरज नाही
चंद्रकातदादांना रोहीत पवार म्हणाले; छोटे मन से कोई बडा नही होता…
Chandrakant Patil-Rohit PawarSarkarnama

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात मेट्रोच्या तयारीची पाहणी केली म्हणून मेट्रोवर हक्कभंग आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली.पाटील यांच्यावर टीका करताना पवार यांनी माजी पंतप्रधान व भाजपाचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजेपयी यांची ‘‘ छोटे मन से काई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता.’’ ही कविता ट्विट करून पाटील यांना टोला लगावला आहे.

Chandrakant Patil-Rohit Pawar
चंद्रकांतदादांचे आव्हान : हिंमत असेल तर राऊतांनी गोव्यातून निवडणूक लढवावी

मेट्रोच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पवार यांनी पिंपरीतील मेट्रो स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास केला.ही ‘ट्रायल’ घेताना केवळ पवार यांनाच बोलाविण्यात आले.पुण्याच्या तसेच मावळच्या खासदारांना निमंत्रित करण्यात आले नाही.पुणे-पिंपरीतील आमदारांनाही बोलाविण्यात आले नाही, असा आरोप करून पाटील यांनी मेट्रोवर हक्कभंग आणण्याची घोषणा केली. त्यावर आमदार रोहीत पवार यांनी ट्विट करून पाटील यांना उत्तर दिले आहे.

Chandrakant Patil-Rohit Pawar
पुण्यात मेट्रोची ट्रायल; राष्ट्रवादी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करतेय

पवारसाहेबांनी मेट्रोची पाहणी केली म्हणून लगेच मेट्रोवर हक्कभंग आण्याची भाषा चुकीची असून यास भीती म्हणायची की संकुचित मनोवृत्ती, असा प्रश्‍न रोहीत पवार यांनी केला आहे. दरम्यान, पाटील यांनी या प्रकरणात आपण मेट्रो कंपनीविरूद्ध हक्कभंग दाखल करणार असून इतर आमदारानांही हक्कभंग दाखल करण्यास सांगणार असल्याचे म्हटले आहे.

मेट्रोच्या कामाच्या श्रेयाची पवारांना गरज नाही : काकडे

ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राच्या विधिमंडळातून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत त्यामुळे ते महाराष्ट्राचे खासदार आहेत.पवार यांनी मेट्रोची फेरी करीत असताना त्याचे कुठही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही, असे राष्ट्रवादी कॉंक्रसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. पवार यांनी संपूर्ण मेट्रो प्रकल्पाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मेट्रो अधिकाऱ्यांशी सविस्तरपणे चर्चा केली, काही अडचणी आहेत का याची चौकशी केली. दिल्ली-मुंबई मधील काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले. त्यामुळे मेट्रो श्रेय घेण्याचा पवार साहेबांचा कुठलाही प्रयत्न नाही किंबहुना त्यांना त्याची गरजही नाही, असे काकडे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मेट्रो पाच वर्षे कोणत्या पक्षाच्या खासदारा मुळे प्रलंबित राहिली याचा शोध चंद्रकांत पाटलांनी घ्यावा, अर्थात ते घेतील असं मला वाटत नाही, फक्त पवार यांचे नाव घेऊन टीका टिप्पणी करणे या पलीकडे त्यांच्या पक्षात पाटील यांना काम राहिले नाही, असे काकडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.