शिवनेरी महोत्सवातून बेनके, कोल्हेंना बाहेरचा रस्ता; दरेकरांच्या हाती सुत्रं!

Shivneri News : महोत्सव आयोजन समितीमध्ये प्रविण दरेकरांना स्थान देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त...
Pravin Darekar, Atul Benke, Amol kolhe
Pravin Darekar, Atul Benke, Amol kolhe Sarkarnama

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी परिसरात शिवनेरी महादुर्ग महोत्सव १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ ला आयोजित करण्यात आला आहे. मात्र या महोत्सवाच्या आयोजन समितीमध्ये स्थानिक आमदार अतुल बेनके आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना वगळण्यात आलेय. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये भाजप आमदार प्रविण दरेकर यांना स्थान देण्यात आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

शिवनेरी (Shivneri) महादुर्ग महोत्सवासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्यावतीने ८ कोटी रुपयांच्या निधीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मान्यता दिली. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शासनाच्यावतीने शिवजयंती सोहळा साजरा होतो. मात्र मागील दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे हा सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर यंदाचा शिवजयंती सोहळा दैदीप्यमान पद्धतीने साजरा व्हावा, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते.

Pravin Darekar, Atul Benke, Amol kolhe
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यानंतर उद्या राहुल गांधींनाही भेटणार जळगावचे खलीकबापू

या महोत्सवासाठी मंत्री लोढा यांच्याशी चर्चा करून गुरूवारी (ता.१७) शासन आदेश काढत १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान शिवनेरी जुन्नर येथे महादुर्ग उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली.

Pravin Darekar, Atul Benke, Amol kolhe
Savarkar : 'एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी घडवून आणली!'

यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्व खात्याचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, उपविभागीय अधिकारी जुन्नर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणचे कार्यकारी अभियंता, जुन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक, नाट्य कलावंत जयेंद्र मोरे, विभागीय पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक आदींचा समावेश आहे. मात्र महोत्सव आयोजन करताना समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी जुन्नरचे आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वगळण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com