दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार 

.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा झाली नाही
varsha.jpg
varsha.jpg

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने  घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १६) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा झाली नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील जवळपास १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.(The results of the 10th will be announced tomorrow at 1 pm)

विद्यार्थ्यांना राज्य http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विषयनिहाय मिळालेले गुण संकेतस्थळावर पाहता यतील.राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानुसार दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ते ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविले. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. 

असे होईल मूल्पमापन 
-  इयत्ता नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय होणार गुणदान
- संबंधित संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील.
- विषयनिहाय एकत्रित निकाल प्रिंट काढता येईल

सोळा लाखावर विद्यार्थी
दहावीच्या परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी 
विद्यार्थी : ९,०९,९३१
विद्यार्थिंनी : ७,४८,६९३
एकूण : १६,५८,६२४ 

- निकाल पाहण्यासाठी लिंक : http://result.mh-ssc.ac.in
- शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in
.Edited By : Umesh Ghongdae 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com