संजय राऊतांच्या सभेचा परिणाम; हडपसर शिवसेनेची ‘एकला चलो’ची तयारी

आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीशी (NCP) वाद होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांच्या सभेचा परिणाम; हडपसर शिवसेनेची ‘एकला चलो’ची तयारी
Sanjay Raut Sarkarnama

पुणे : हडपसरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेली खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची झंझावाती सभा किमान हडपसरमधल्या शिवसेनेला (Shivsena) नवसंजीवनी मिळवून देईल, अशी आशा शिवसैनिकांना आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ नेत्यांची सभा शिवसेनेमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे. या साऱ्या घडामोडींवरून हडपसर मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यातून आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीशी (Ncp) वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ही जागा मिळाली नाही तर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी शिवसेना करीत असल्याचे दिसत आहे.

Sanjay Raut
राजकीय धमाका होणार; आघाडीतील डझनभर नेते 'एनआयए'च्या रडारवर

हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा समाजवाद्यांचा नंतर कॉंग्रेस विचारसरणीचा राहिलेला आहे.१९९५ या निवडणुकीत सूर्यकांत लोणकर पहिल्यांदा या मतदासंघातून शिवसेनेचे आमदार झाल्या. त्यांच्या रूपाने हडपसरमध्ये पहिल्यांदा भगवा फडकला.यानंतर कोंढवा, महंमदवाडी, हडपसर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने आपली पकड हळूहळू या मतदारसंघात मजबूत केली. शिवसेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनीही या मतदारसंघात लक्ष घातले. शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, डॉ. नीलम गोऱ्हे, उदय सामंत व सध्याचे विद्यमान नामदार सचिन आहिर यांनी शहर संपर्कप्रमुख म्हणून पुणे शहरातील पूर्व भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बांधणीसाठी चांगले प्रयत्न केले.त्याचाच परिणाम म्हणून पुणे महानगरपालिकेत शिवसेना नगरसेवकांची संख्या वाढलेली होती.

Sanjay Raut
शरद पवार म्हणाले, ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवलं...

मागील पुणे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या झंझावातामध्ये शिवसेना नगरसेवकांची संख्या कमी झालेली असली तरी या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर जोर देणे गरजेचे आहे. महंमदवाडी व कोंढवा येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला गड भाजपच्या झंझावातात ही कायम राखला होता. महंमदवाडी येथील नगरसेवक नाना भानगिरे यांनी आमदारालाही लाजवेल अशी विकासकामे आपल्या मतदारसंघात केलेली आहेत. अशी स्तुती स्वतः संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी नुकतीच केली आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत अनेक प्रभागामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे.या मतदारसंघात विशेष लक्ष घालून पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी नियुक्त पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचे फलित दिसेल. तूर्तास इतकेच की संजय राऊत यांच्या सभेमध्ये झालेली गर्दी शिवसैनिकांमधील उत्साह शिट्ट्या, टाळ्या व घोषणा यामुळे महापालिका निवडणूक पुढे ढकलल्याने काहीशा मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये या सभेने जान आणली असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.