Mns News : धंगेकरांचा प्रचार करणाऱ्यांची मनसेतून हकालपट्टी; या कारवाईविरोधात ५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

Kasba By Election : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत मनसेकडून सात जणांची हकालपट्टी
raj thackeray
raj thackeraysarkarnama

Pune News : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. याचदरम्यान,राज ठाकरेंचा आदेश डावलून महाविकास आघाडीचे उमेदवार कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करणाऱ्या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता या कारवाईनंतर मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईविरोधात तब्बल ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.

पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत मनसे(Mns)कडून सात पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. यात रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे.

मात्र, या कारवाईनंतर आथा मनसेत मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण या कारवाईविरोधात तब्बल ५० कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहेत.

raj thackeray
Chinchwad By-Election : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला मोठा फटका ; काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

मनसेनं हकालपट्टी करताना काय म्हटलं होतं ?

गेल्या काही वर्षांपासून हे लोक पक्षात कार्यरत नाहीत. पक्षाच्या कोणत्याही कामात किंवा कार्यक्रमात हे लोक सक्रिय नसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असं बाबर यांनी जाहीर केलेल्या पत्रात लिहिलं आहे.

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार मनसैनिक प्रचारात सहभागी न होता वैयक्तित पातळीवर भाजपचं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असं मनसैनिकांना सांगण्यात आलं होतं.

raj thackeray
Uddhav Thackeray : ठाकरेंपाठीमागची संकटांची मालिका थांबेच ना; आता 'हा' नेता निवडणूक लढवण्यासाठी ठरला अपात्र

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार मनसैनिक प्रचारात सहभागी न होता वैयक्तित पातळीवर भाजपचं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असं मनसैनिकांना सांगण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in