संभाजी ब्रिगेडची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नवी घोषणा : आरक्षणाकडून अर्थकारणाकडे...

संभाजी ब्रिगेडचे यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे रौप्य महोत्सवी वर्षाचे अधिवेशन होणार आहे.
Praveen Gaikwad
Praveen GaikwadSarkarnama

जुन्नर (जि. पुणे) : संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेच्या कार्याचे सिंहावलोकन करून भविष्याची दिशा देण्याच्या हेतूने आरक्षणाकडून अर्थकारणाकडे जाण्याचा नारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांनी रविवारी (ता. ४ डिसेंबर) जुन्नर (Junnar) तालुक्यातील उंब्रज येथे बोलताना दिला. (Reservation to Economics : New Announcement on Silver Jubilee Year of Sambhaji Brigade)

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ता. २८ डिसेंबर रोजी पुण्यात (Pune) एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहितीही गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Praveen Gaikwad
शिंदे गटाच्या आमदारांचा जीव पुन्हा टांगणीला : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त 'या' कारणांमुळे पुन्हा हुकणार?

संभाजी ब्रिगेडचे यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे रौप्य महोत्सवी वर्षाचे अधिवेशन होणार आहे. त्यानिमित्त उंब्रज येथे श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सुभाष बोरकर, खजिनदार अमोल काटे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष रमेश हांडे, संघटक अजितसिंह भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

Praveen Gaikwad
भाजपने वाढविले गवळी, बारणे, किर्तीकरांसह शिंदे गटाच्या पाच खासदारांचे टेन्शन

प्रवीण गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड १९९७ पासून कार्यरत आहे. या वर्षी संघटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अधिवेशनात संघटनेच्या कार्यकालाचे सिंहावलोकन करून भविष्याची दिशा देणे हा प्रमुख हेतू आहे. या अधिवेशनाच्या उदघाटन सत्रात छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी तसेच संजावळचे आबाजी राजे भोसले, चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योजक, साहित्यिक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे‌.

Praveen Gaikwad
‘त्या’ बंडखोर १६ आमदारांना निलंबित करावेच लागणार : महाराष्ट्रातील बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात बहुजन समाजात ऐक्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच या समाजाला एकत्र आणण्यासाठी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. एकविसाव्या शतकात अर्थकारण ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात आरक्षणाकडून अर्थकारणाकडे या विषयावर उद्योगपतींचे मार्गदर्शन असणार आहे, असेही गायकवाड यांनी नमूद केले.

छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जिवंत ठेवण्याचे काम करणारे डॉ. अ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, म. ना. देशमुख यांचा या अधिवेशनात सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. बहुजन मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे‌.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in