शिवरायांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा.. : श्रीरंग बारणेंचा इशारा

MP Shrirang Barne| महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधीत्व करत असताना माझ्या पाठपुराव्याने डांगे चौकात हा पूल उभारला गेला.
MP Shrirang Barne|
MP Shrirang Barne|

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका थेरगावातील डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पँराडाइज हे शिल्प बसण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकले जात असल्याने पालिका प्रशासनाने येत्या दोन दिवसात हे शिल्प काढावे,नाहीतर मी स्वत: ते काढून टाकेल, असा इशारा शिवसेना (Shivsena) खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांनी दिला.

हे शिल्प हटवण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनही दिले आहे. ''महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधीत्व करत असताना माझ्या पाठपुराव्याने डांगे चौकात हा पूल उभारला गेला. त्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. या चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळाही आहे. महाराजांकडे पाहिले की नागरिकांना वेगळी उर्जा मिळते.

MP Shrirang Barne|
बावनकुळे धनंजय मुंडेंच्या कानात काय कुजबुजले? भेटीगाठींनी चर्चांना आलं उधाण

पण, स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका प्रशासन काही पण उद्योग करत आहे. कुठेही काहीही बसविले जात आहे. डांगे चौकात हे शिल्प बसविले जात आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकला जात असून त्यामुळे महाराजांच्या नावाचे, परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. हे शिल्प दोन दिवसात काढून टाकावे नाहीतर मी स्वत ते काढून टाकेल, असा इशारा खासदार बारणे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com