Politics : 'चिंचवड' लढायचे की नाही हे राष्ट्रवादीचे दोन दिवसांत ठरणार; तर भाजपचा उमेदवारच...

Politics : महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत होणार अंतिम निर्णय
NCP and BJP
NCP and BJP Sarkarnama

पिंपरी : भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची लागलेली पोटनिवडणूक लढण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत काल (ता.२०) एकमताने करण्यात आला.

त्याची प्रत पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांना शहर राष्ट्रवादीने आज (ता.२१) प्रत्यक्ष भेटून देत त्यांनाच साकडे घातले. दरम्यान, चिंचवड लढायचे की कसे याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार असल्याचे पवारांना भेटलेल्या राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले.

NCP and BJP
Politics : ठाकरेंनी आदेश दिला तर रत्नागिरीतून सामंतांविरोधातही लढेन : भास्कर जाधवांचे खुले आव्हान

सोमवारच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मुंबईतील बैठकीत होणार असल्याचे सांगण्यात आले. शहर पक्ष पदाधिकाऱ्यांचा आग्रह व मागणी पाहता चिंचवड लढण्याचा निर्णय होऊ शकतो, असे तेथून इच्छूक असलेल्या व पवारांना भेटलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे स्व.आ.जगताप यांच्या पत्नी अश्विनी की बंधू शंकर कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णयही भाजप (BJP) दोन दिवसांत घेणार असल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले. अश्विनी यांनाच उमेदवारी देण्य़ासाठी चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेविकांनीही आता कंबर कसली आहे.

NCP and BJP
Sunil Shelke :...अन् पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांना खुद्द आमदारांनीच दिली `लिफ्ट`

शरद पवार (Sharad Pawar) हे उद्योगनगरीत भोसरीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी सायंकाळी आले होते. त्यावेळी तेथेच भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईऱ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, पिंपरी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांची भेट घेत चिंचवड लढण्याच्या शहर पक्षाने केलेल्या ठरावाची प्रत त्यांना दिली.

NCP and BJP
Politics : ठाकरेंनी आदेश दिला तर रत्नागिरीतून सामंतांविरोधातही लढेन : भास्कर जाधवांचे खुले आव्हान

या नेत्यांतील काटे यांनी अगोदरच आपण लढणार असल्याचे जाहीर करत सोशल मीडीयातून प्रचारही सुरु केला आहे. शितोळे आणि कलाटे हे ही इच्छूक आहेत. तर, पक्षाने संधी दिली, तर आपण लढू, असे भोईर यांनी आज `सरकारनामा`ला सांगितले. दरम्यान, या पोटनिवडणुकासाठी राष्ट्रवादीची चिंचवडमध्ये बऱ्यापैकी मोट बांधली गेल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com