जीवघेण्या आजारातून उठलेले आमदार जगताप पुन्हा सक्रिय ; पालिका आयुक्तांना धरले धारेवर

Laxman Jagtap|PCMC|Rajesh Patil : पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोणावळ्याला घेऊन जाता अन् पिंपरी -चिंचवडकरांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.
PCMC Commissioner Rajesh Patil & MLA Laxman Jagtap Latest News
PCMC Commissioner Rajesh Patil & MLA Laxman Jagtap Latest News Sarkarnama

Laxman Jagtap : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) मुदत संपल्याने तेथे सध्या प्रशासकीय कारभार आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी म्हणजे पालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानांत प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी कडाडून विरोध करीत पाटील यांना आज (ता.२० जुलै) सज्जड इशारा दिला. जीवघेण्या आजारातून नुकतेच बरे झालेले आमदार जगताप हे लगेचच पुन्हा सक्रिय झाल्याचे यातून दिसून आले आहे. (PCMC Commissioner Rajesh Patil & MLA Laxman Jagtap Latest News)

PCMC Commissioner Rajesh Patil & MLA Laxman Jagtap Latest News
OBC Reservation : 'हा विजय ओबीसींच्या हक्कांचा अन् महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा'

पालिकेच्या उद्यान विभागाची ही नियोजित प्रवेश शुल्कवाढ तातडीने रद्द करा, नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा लेखी इशारा जगतापांनी प्रशासकांना दिला आहे. एकीकडे प्रशिक्षणाच्या नावाखाली पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोणावळ्याला घेऊन जाऊन हॉटेलमध्ये पिंपरी-चिंचवडकरांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करता आणि दुसरीकडे शहरातील उद्यानांमध्ये विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिक व बालगोपाळांना शुल्क आकारता. हा उधळपट्टीचा आणि निधी गोळा करण्याचा कारभार बिलकूल चालणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी आपल्या स्वभावानुसार आयुक्तांना भरला आहे.

शहरात महापालिकेच्या अनेक मोठ्या मिळकती, सभागृहे आहेत. तरी देखील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोणावळा येथे एक दिवस प्रशिक्षण देण्यात आले. त्यावर करदात्यांचे लाखो रुपये प्रशासनाने उधळले. दुसरीकडे उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क वसुलीचा प्रस्ताव म्हणजे महापालिका प्रशासनाची उधळपट्टी आणि नागरिकांकडून वसुलीची त्यांची मानसिकता दिसून येते, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. ही मानसिकता शहराच्या विकासाची किंवा हिताची नाही. त्यामुळे असा कारभार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या या कारभाराबाबत शहरवासियांत तीव्र संतापाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे त्याला प्रशासनाने वेळीच आवर घालावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

PCMC Commissioner Rajesh Patil & MLA Laxman Jagtap Latest News
'तहसीलदार रात्री घाबरत; तर पोलिस अधिकारी हे कोणी नसल्याचे पाहूनच भेटायला यायचे!'

उद्यानाचे शहर उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये पालिकेची १९५ सार्वजनिक उद्याने आहेत. करदात्या नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा, काही क्षण विरंगुळा म्हणून जगता यावेत यासाठी ती विकसित करण्यात आली आहेत. पर्यावरण संतुलनाचे कामही त्यातून होते. तेथे जेष्ठ नागरिक, महिला व बालगोपाळ गर्दी करतात. या विरंगुळ्यासाठी उद्यानात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्याकरिता मोठ्या व्यक्तींना २० रुपये, तर बालकांकडून १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शहरात गरज नसतानाही अनेक लहान विकासकामांसाठी नेमलेल्या सल्लागारांवरील अनावश्यक खर्च कमी करून तो उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीसाठी वापरण्यात यावा, पण उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे आवाहन जगतापांनी पालिका प्रशासन तथा प्रशासकांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com