पुण्यात मानाच्या गणपती मंडळांविरोधात बंड; विसर्जन मिरवणुकीवरून न्यायालयीन लढाई

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची (Ganesh Festival in Pune) १३० वर्षांची मोठी परंपरा आहे.
ganesh Fastival pune
ganesh Fastival puneSarkarnama

पुणे : मानाच्या गणपतींमुळे पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो. संकेत आणि परंपरेमुळे मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीआधी इतर मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीआधी पूर्व भागातील इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीला परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका पुण्याच्या पूर्व भागातील दोन मंडळानी केली आहे. (Ganesh Festival in Pune)

ganesh Fastival pune
म्हसवड 'एमआयडीसी'ला माझा विरोध कधीच नव्हता : रामराजे

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची १३० वर्षांची मोठी परंपरा आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडईतून सुरू होते. लक्ष्मी रस्तामार्गे डेक्कन जिमखान्यावर मुठा नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करून मिरवणूक संपते. दरवर्षी सुमारे २५ ते ३० तास मिरवणूक चालते. मात्र, याचा फटका मानाचे गणपती वगळता इतर गणपती मंडळांना विशेषत: पूर्व भागातील मंडळांना बसतो. पूर्व भागातदेखील शंभर वर्षापूर्वीपासून गणेशोत्सव करणारी अनेक मंडळे आहेत.

ganesh Fastival pune
४० हजारांची लाच मागणारा तलाठी ACB च्या जाळ्यात

रविवार पेठेतील १३० वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बढाई समाज तरूण मंडळ व पांगुळ आळी गणेश मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मानाच्या गणपती मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत बारा-बारा तास थांबावे लागते. त्यामुळे वेळेत विसर्जन करता येत नाही. यावर उपाय म्हणून मानाच्या गणपती मंडळांच्या आधी लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या दोन्ही मंडळांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

ganesh Fastival pune
बावनकुळे सहा सप्टेंबरला बारामतीत; लोकसभा निवडणूक जिंकण्याची रणनीती आखणार

विसर्जन मिरवणूक मानाच्या पाच ठराविक मंडळांच्या मिरवणुकीने सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. अर्थात ही केवळ परंपरा आहे. नियम नाही. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिल्यास ज्यांना लवकर मिरवणूक काढायची आहे अशा मंडळांना सकाळी लवकर मिरवणूक काढणे शक्य होईल, अशी याचिकाकर्त्या मंडळांची भावना आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत या मंडळांनी याचिका दाखल केली आहे. या मंडळांव्यतिरिक्त अन्य काही मंडळेदेखील याच मुद्दयावर याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यातील मिरवणूक वेळेत संपविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जबाबदार मंडळांनी विचार करण्याची गरज आहे. गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही यातून मार्ग निघत नसल्याने काही मंडळांनी न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग स्वीकारल्याचे गणेश मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय बालगुडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com