Chinchwad By Election : बंडखोर कलाटेंचं पराभवानंतर मोठं विधान; म्हणाले,''धंगेकरांसारखा मी पण...!''

Rahul Kalate On Mahavikas Aaghadi : माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं...
Rahul Kalate
Rahul KalateSarkarnama

Pimpri Chinchwad News : पारंपारिक मतदारसंघ असलेल्या कसब्यात मानहानीकारक पराभव स्विकारावा लागल्यानंतर चिंचवड मतदारसंघात भाजपनं विजयाला गवसणी घातली. यावेळी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी 36 हजारांच्या मताधिक्यानं महाविकास आघाडीच्या नाना काटे यांचा दारुण पराभव केला. हा पराभव अजित पवारांचा मोठा धक्का मानला जात आहे.

मात्र, अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी चिंचवड पोटनिवडणुकीतील पराभवाचं खापर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंवर फोडलं आहे. पण आता कलाटे यांनी पराभवानंतर अखेर आपलं मौन सोडलं आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप(Ashwini Jagtap) यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

Rahul Kalate
Assembly Elections 2023: तीन राज्यांच्या निकालांमध्ये भाजपचा झंझावात पाच राज्यांसाठी 'मिशन २००४' ला बळ ठरणार ?

बंडखोर उमेदवार राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी पराभवानंतर वाकड येथे माध्यमांशी संवाद साधला आहे. कलाटे म्हणाले, महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी दिली असती तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं अशी खदखदही कलाटेंनी बोलून दाखवली.

कलाटे म्हणाले, ही निवडणूक विकास कामांवर होईल असं वाटलं. पण प्रत्यक्षात सहानुभूती आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली. माझा पराभव झाला असला तरी मी कुठं चुकलो याचा शोध घेत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांनी ताकद मोठी होती. मी, जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवत होतो.

Rahul Kalate
By Election : चिंचवडमध्ये भाजपचा विजय हा त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभवच; राष्ट्रवादीची पराभवानंतर प्रतिक्रिया

महाविकास आघाडी(MVA)कडून मी लढण्यास तयार होतो. मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी मिळाली असते तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. या मतदार संघात तशी अनुकूल परिस्थिती होती. मला डावलायला नको होतं असं मत कलाटे यांनी व्यक्त केलं आहे. २०२४ ला पुन्हा निवडणूक होणार आहे. त्याची तयारी मी करणार आहे. पण, ते कुठल्या पक्षाकडून लढणार किंवा पक्षात असणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. यावेळी राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

कलाटेंचं डिपॉझिट जप्त..

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आघाडीतील ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे हे तेथील आघाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. मात्र, कलाटेंही मोठा झटका बसला असून विजयाचा दावा करणाऱ्या कलाटेंचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या चिंचवड मतदारसंघात ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदान केले.त्याच्या एक षष्टांश म्हणजे १६.६ टक्के मतं (४७ हजार ६६६)अनामत शाबूत राहण्यासाठी मिळणं गरजेचं होतं.हा कोटा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे (Nana Kate)यांनी पूर्ण केला. त्यांना ९९,३४३ मते पडली. तर,कलाटेंसह बाकीच्या सर्व २६ उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. कलाटेंना ४४,०८२ मते मिळाली. त्यामुळे विधानसभेला सलग तीनदा पराभवाची हॅटट्रिक चाखलेल्या कलाटेंवर यावेळी डिपॉझिटही गमावण्याची वेळ आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com