सेवाविकास बॅंकेच्या अडचणीत भर; प्रशासक नेमणुकीनंतर आता 'आरबीआय'चे निर्बंध

बॅंकेचा परवानाच रद्द करण्यात आल्याची जोरदार आवई उठली होती.
सेवाविकास बॅंकेच्या अडचणीत भर; प्रशासक नेमणुकीनंतर आता 'आरबीआय'चे निर्बंध
Seva Vikas Banksarkarnama

पिंपरी : सिंधी व्यापाऱ्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बॅंकेत काही शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा आहे. त्याप्रकरणी १६ गुन्हे दाखल झाले असून त्यात बॅंकेच्या माजी अध्यक्षांना अटकही झाली आहे. त्यामुळे रिझर्व बॅंकेने (Reserve Bank) यावर्षी ४ जूनला बॅंकेवर प्रशासक नेमला. त्यानंतर आता बुधवारपासून बॅंकेवरही आर्थिक निर्बंधही टाकले. त्यामुळे बॅंकच नाही, तर व्यापारीही अडचणीत आले आहेत.

Seva Vikas Bank
अजितदादांकडून शिवसेनेला दे धक्का; बारणेंच्या विश्वासू सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, बॅंकेचा परवानाच रद्द करण्यात आल्याची जोरदार आवई उठली होती. मात्र, तो रद्द करण्यात आला नसून फक्त आर्थिक निर्बंध टाकण्यात आले, असल्याचे रिझर्व बॅकेने मंगळवारी (ता.१२) काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांना बॅंकेतून आता फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या लाखो रुपये बॅंकेत अडकून पडल्याने ते अडचणीत सापडले आहेत. सभासद, ठेवीदार, खातेदारांच्या माहितीसाठी निर्बंधाच्या आदेशाची प्रत बॅंकेचे मुख्यालय आणि प्रत्येक शाखेवर लावण्यास सांगण्यात आले आहे. ती पाहून व्यापारी खातेदार डोक्याला हात लावून घेतल्याचे दिसून आले. हे निर्बंध सहा महिने लागू राहणार आहेत. परिस्थिती पाहून नवीन आदेश जारी केला जार्ईल, असे आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाळ यांनी म्हटले आहे.

Seva Vikas Bank
'भोसरी' प्रकरणात मंदाकिनी खडसेंना न्यायालयाचा मोठा दिलासा

२५ शाखा, दहा हजार सभासद आणि सातशे कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या सेवाविकास बॅंकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाविरुद्ध कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल एकेक गुन्हा दाखल होण्यास सुरवात झाली. बॅंकेच्या ठेवी जवळजवळ निम्यावर आल्या. फसवणूक आणि अपहाराच्या गुन्ह्यांची मालिका सुरुच राहिल्याने आरबीआयला दखल घ्यावी लागली. त्यांनी बॅंकेवर प्रशासक नेमला. तो नेमून चार महिन्यांनंतरही म्हणावी तशी प्रगती म्हणजे थकित कर्जवसूली झाली नाही. बॅंकेची आर्थिक स्थिती सुधारली गेली नाही. परिणामी आरबीआयने पुढील कारवाई मंगळवारी केली. अनेक निर्बंध बँकेवर टाकल्याने खातेदारांची कोंडी झाली आहे. आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय आता सेवाविकास बॅंकेला कुठलेही कर्ज मंजूर करता येणार नाही. कर्जाला मुदतवाढ देता येणार नाही. तसेच कर्जही घेता येणार नाही. अनामत ठेवता येणार नाही. गुंतवणूक करता येणार नाही. बॅंकेला आपली कुठलीही मालमत्ता विकण्यास निर्बंध टाकण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.