Dhangekar Vs Rasane : रवींद्र धंगेकरांचा रासनेंवर कडक पलटवार; म्हणाले,'' तो मोठा माणूस,पण...''

Kasba by Election : मी देखील पाचवेळा महापालिकेत निवडून आलोय...
Ravindra Dhangekar & Hemant Rasane
Ravindra Dhangekar & Hemant RasaneSarkarnama

Pune Political News : कसबा पोटनिव़डणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंवर दणदणीत विजय मिळवला होता. यानंतर धंगेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर रासनेंनी धंगेकरांना खडेबोल सुनावले होते. आता नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी रासनेंच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे.

रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. धंगेकर म्हणाले,हेमंत रासने मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार. मी फडणवीसांना काहीच बोललो नाही. मी काही एवढा मोठा नाही पण फक्त एक कार्यकर्ता म्हणून विनंती केली. मात्र, मी देखील पाचवेळा महापालिकेत निवडणून आलोय. तीन विधानसभा निवडणूका लढवल्यात. त्यामुळे रासनेंपेक्षा माझा कार्यकाळ मोठा आहे. रासने यांनी एकदा तो तपासून घ्यावा असं प्रत्युत्तर धंगेकर यांनी रासनेंना दिले आहे.

Ravindra Dhangekar & Hemant Rasane
Chhatrapati Sambhajinagar News : नामांतरावरून राजकारण पेटले, शिरसाट-इम्तियाज भिडले...

रासने नेमकं काय म्हणाले होते?

धंगेकर यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर रासने यांनी भाष्य केले. रासने म्हणाले, रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपलं अभिनंदन ! आपण देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा.

देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत.' असं म्हणत हेमंत रासने यांनी धंगेकरांना खडेबोल सुनावले होते.

Ravindra Dhangekar & Hemant Rasane
Solapur News : '....म्हणूनच शिंदे-फडणवीस महापालिका, झेडपीच्या निवडणुका घेण्याचे धाडस करत नाहीत'

...पण त्यानंतर लोक फडणवीसांना नमस्कारही घालणार नाही!

कसब्यातील विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कुरघोडीचं, दुश्मनीचं आणि दबावाचं आहे. विरोधकांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करायचं हाच अजेंडा घेऊन फडणवीस काम करतात. लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. आज सत्तेत असल्याने लोक त्यांना नमस्कार करतात पण सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाही. फडणवीसांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com