
Ravindra Dhangekar : भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemnat Rasne) यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला. धंगेकर यांना ७३१९४ मते मिळाली. तर रासनेंना ६२२४४ मते मिळाली.
विजयानंतर धंगेकर यांचे कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांकडून घोषणबाजी करण्यात आले. आमचा भाऊ घासून नाय ठासून आलाय, अशा घोषणा देण्यात आला. धंगेकर विजयी होताच, कसबा गणपतीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. यावेळी धंगेकरांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणवार जमा झाले होते. कसबा पेठेतल्या चौकाचौकात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, डिजेच्या तालावर नाचत धंगेकराचं विजयाचा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
काँग्रेस भवन मध्ये मोठ्या कालावधीनंतर जल्लोष :
धंगकरांच्या विजयानंतर काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काँग्रेस भवनने मोठ्या कालावधीनंतर एवढा मोठा विजय पाहिला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. काँग्रेस भवनात जवळपास हजार कार्यकर्ते जमले होते. या विजयामुळे काँग्रेस भवनमध्ये मोठ्या कालावधीनंतर जल्लोष पाहायला मिळाला.
शहर राष्ट्रवादी कार्यालयात धंगेकरांचा विजय साजरा :
काँग्रेस भवनच्या जवळच असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसला. राष्ट्रवादीच्या जवळपास दोनशे कार्यकर्त्यांनी कार्यालयात विजयाचा जल्लोष केला. यावेळी फटाके ही फोडण्यात आले. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवीदीनेही धंगेकरांच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी झोकून दिले होते. आज धंगेकरांचा विजय होताच, राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.