मोदींनी देहूत येऊन थाप मारली... रत्नाकर महाजनांनी शोधला मुद्दा

देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधानांची सावरकरांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते, असे सांगितले
Narendra Modi, Ratnakar Mahajan
Narendra Modi, Ratnakar Mahajansarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. यावरुन आता काँग्रेसने (Congress) जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांनी मोदींच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, ''सावरकर व तुकाराम...सावरकर यांच्या लिखाणात तुकाराम किंवा कोणत्याही संताचा उल्लेख नाही. त्यामुळे अंदमानात साखळदंडाच्या चिपळ्या करून तुकारामाचे अभंग ते गात होते ही निव्वळ थाप आहे.'' अशा शब्दांत महाजन यांनी मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांच्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Narendra Modi, Ratnakar Mahajan
अजित पवारांच्या भाषणाचा नंबर फडणविसांनी कट केला...

शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करणारे केंद्र असल्याच्या भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या. "मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या" या ओळींनी भाषणाची सुरूवात केली. या वेळी संत तुकाराम महाराजांच्या अंभगातील अनेक ओळी म्हणत त्या आजच्या काळात देखील कशा उपयुक्त आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

Narendra Modi, Ratnakar Mahajan
अजित पवारांना भाषणबंदी; हा तर भाजपकडून महाराष्ट्राचा अपमान...महेश तपासे

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. त्यांचे अभंग हे जेवढे भागवत भक्तासाठी महत्वाचे आहेत, तेवढेच ते राष्ट्रनिर्मीतीसाठी महत्वाचे आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com