Rashmi Shukla : 'फोन टॅपिंग' प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ? कोर्टाने 'क्लोजर रिपोर्ट' फेटाळला!

Rashmi Shukla : कुणाच्या म्हणण्यावरून हे फोन टॅपिंग केले?
Rashmi Shukla
Rashmi Shuklasarkarnama

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. पुणे (Pune News) पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयाने आता फेटाळून लावले आहे. राजकीय नेत्यांचा फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला. यामुळे आता शुक्ला यांच्या अडचणी वाढू शकतात.

Rashmi Shukla
Gram Panchayat Election : भाजप निवडून आलेल्या सरपंचांची यादी जाहीर करणार?

रश्मी शुक्ला यांनी काही महाविकाश आघाडीतील काही आमदारांचे, काही तत्कालीन मंत्र्यांचे फोन टॅपिंग केले होते. हा सगळा प्रकार पोलिसांमध्ये दाखल झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर तपास सुरू झाला. परंतु तपासामध्ये मात्र काही आढळून आलं नाही, असे सांगण्यात आले. यानंतर या संपूर्ण प्रकारणामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टवर आज पुणे न्यायालयात युक्तिवाद झाला तेव्हा, न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळून लावला.

Rashmi Shukla
Bhidewada News : पुण्यातील भिडेवाड्याविषयी मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

पोलिसांचा क्लोजर फेटाळल्याने आता सरकारपुढील अडचणीही वाढू शकतात. रश्मी शुक्ला यांच्यावर आरोपही झाले होते. शुक्ला यांनी कुणाच्या म्हणण्यावरून हे फोन टॅपिंग केले? या संदर्भात ही आरोप झाले होते. जेव्हा हा क्लोजर रिपोर्ट फाईल करण्यात आला, आता तो न्यायालयाने फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com