Rashmi Shukla Phone Tapping: शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का ; फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयाने दिला 'हा' आदेश

Rashmi Shukla News: या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना न्यायालयाने दिले आहे.
 Rashmi Shukla
Rashmi Shuklasarkarnama

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणामध्ये (Phone Tapping) पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. पुणे (Pune News) पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Rashmi Shukla Phone Tapping news)

रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांचा फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप होता. राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. नुकताच न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. यामुळे आता शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट कशी दिली गेली, यावरुन हिवाळी अधिवेनात वाद निर्माण झाला आहे.

 Rashmi Shukla
Maharashtra Assembly : ३८ वर्षानंतरही शेतकरी वंचितच ; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

पुणे सत्र न्यायालयाने फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी चौकशी वेळी रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचं म्हटलं आहे. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते.

काही महाविकाश आघाडीतील काही आमदारांचे, काही तत्कालीन मंत्र्यांचे फोन रश्मी शुक्ला यांनी टॅपिंग केले होते. हा सगळा प्रकार पोलिसांमध्ये दाखल झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर तपास सुरू झाला. परंतु तपासामध्ये मात्र काही आढळून आलं नाही, असे सांगण्यात आले. यानंतर या संपूर्ण प्रकारणामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टवर पुणे न्यायालयात युक्तिवाद झाला तेव्हा, न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळून लावला.

भाजप खासदार संजय काकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रावसाहेब दानवे यांचे पीए, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. याशिवाय काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकारांचे फोन टॅपिंगचे आरोप आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com