पुणे पुन्हा हादरलं! रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिडीत मुलगी 20 दिवसांपूर्वी नेपाळहून भारतात नोकरीच्या शोधात आली होती.
Pune Crime
Pune Crime

पुणे : पुणे (Pune) शहरातून पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. 5 जानेवारी रोजी हडपसर भागातील रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने नेपाळहून (Nepal) आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी बलात्कार (Rape Case) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

Pune Crime
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अखेर रद्द

मिळालेल्या माहितीनुसार,पिडीत मुसगी 20 दिवसांपूर्वी नेपाळहून भारतात नोकरीच्या शोधात आली होती. 5 जानेवारीला रात्री ती आणि तिची मैत्रिण आरोपीच्या रिक्षातून प्रवास करत होत्या. मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. आरोपीने मुलींकडे पैसे नसल्याचा फायदा घेत मित्रांसोबत मिळून तिच्यावर बलात्कार केला. मात्र याे तिची मैत्रीण यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान त्यानंतर पीडित मुलीबरोबर तिच्या मैत्रीणीने हडपसर पोलिसांत जाऊन तक्रार केली. सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर पीडित मुलगी16 वर्षांची आहे.

संबधित मुलींजवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याचा फायदा घेत आरोपी रिक्षाचालकाने रेसकोर्सजवळील एका सुनसान जागी घेऊन जात मित्रांसोबत तिच्यावर बलात्कार केला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. दरम्यान राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनीही या घटनेची दखल घेतली असून आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com