मुंबई पोलिस दलातील खंडणी खोरांना नगराळे अन् नांगरे पाटलांनी पाडले उघडे

बडतर्फ एपीआय सचिन वाझेनंतर मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील आणखी एक खंडणीचे रॅकेट शनिवारी (ता.१९) समोर आले.
Hemant Nagrale, Vishwas Nagre Patil
Hemant Nagrale, Vishwas Nagre Patilsarkarnama

पिंपरी : बडतर्फ एपीआय सचिन वाझेनंतर मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील आणखी एक खंडणीचे रॅकेट शनिवारी (ता.१९) समोर आले. त्यात एका एपीआय आणि पीएसआयला पकडण्यात आले. तर, मूख्य सूत्रधार पीआय फरार झाला आहे. हे त्रिकूट कोट्यवधी रुपये मूल्याच्या मालाची ने आण करणाऱ्या आंगडिया तथा कुरिअर व्यावसायिकांना आयकर विभागाची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळीत होते. आयजीच्या जीवावर बायजी उधार असा हा गैरप्रकार वाझेने प्रमुख म्हणून काम केलेल्या मुंबई पोलिसांच्या सीआययू (central intelligence unit) ने उजेडात आणून ही कारवाई केली आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी जातीने लक्ष घातल्याने व त्यांनीच कारवाईचा आदेश दिल्याने मुंबई पोलिस दलातील हे नवे खंडणी प्रकरण उजेडात आले. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे आयपीएस अधिकारी (दिलीप सावंत, अतिरिक्त पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई) फिर्यादी असलेल्या या गुन्ह्यात दुसरे एक आयपीएस संशयित आहे. तर, नगराळे आणि मुंबई पोलिस दलाचे सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nagre Patil) या दोन ज्येष्ठ आयपीएसनी लक्ष घातल्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या लुटमारीचे हे प्रकरण समोर आले आहे. खंडणीसह लुट आणि संगनमत केल्याचे कलम या गुन्ह्यात लावण्यात आले आहे. नितीन कदम (एपीआय), समाधान जमदाडे (पीएसआय) आणि ओम वंगाटे (पीआय) अशी खंडणीखोर आरोपी पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Hemant Nagrale, Vishwas Nagre Patil
मुंबई पोलिस दलातील खंडणीचे रॅकेट उद्धवस्त : २ अधिकाऱ्यांना अटक; PI फरार

हिरे, माणके, सोने, दागिने, रोकडसह मौल्यवान चीजवस्तूंची मोठ्या विश्वासाने ने आण करणारा मुंबईचा आंगडीया बाजार हा दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथील मुंबादेवी मंदिर परिसरात पोफळवाडीत आहे. तेथील काही संशयित व्यापाऱ्यांकडून या आरोपी त्रिकूट पोलिस अधिकाऱ्यांनी तुमच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देतो, असे धमकावून पैसे उकळले आहेत. त्याबाबतच्या कारवाईची कसलीच नोंद त्यांनी स्टेशन डायरीत केलेली नाही. मात्र, आंगडीया बाजारातील सीसीटीव्हीने त्यांना दगा दिला. हा भक्कम पुरावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआययूच्या हाती लागला. ज्यांच्याकडून त्यांनी अशाप्रकारे पैसे उकळले अशा काही आंगडीया व्यापाऱ्यांनी जबाब देऊन त्याला दुजोरा दिल्याने हे त्रिकूट अडकले गेले. सरकारनामाच्या हाती लागलेल्या या प्रकरणाच्या एफआयआरमधून ते स्पष्ट झाले आहे. अंगडिया मार्केट हे लोकमान्य टिळक मार्ग (एल.टी.मार्ग) पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.

Hemant Nagrale, Vishwas Nagre Patil
सैन्यात नोकरी देण्याचे आमिष दाखविणारा तोतया अधिकारी गजाआड

या ठाण्यातच आरोपी पोलिस अधिकारी कर्तव्यास आहेत. तेथेच त्यांच्याविरुद्ध आता हा गुन्हा दाखल झाला आहे. मोठी रक्कम बॅगेत असणाऱ्या आंगडीयांना ते बेकायदेशीरपणे चौकीत नेऊन धमकावत पैसे उकळत होते. गत डिसेंबरमध्ये २ ते ६ तारखेदरम्यान हा गुन्हा घडलेला आहे. मात्र, त्याबाबत काही आंगडीया व्यापाऱ्यांनी अॅडिशनल सीपी सावंत यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ती जॉंईट सीपी नांगरे व सीपी नगराळे यांच्या कानावर घातली. त्यांच्याकडून कारवाईचा आदेश आल्यानंतर चौकशीला वेळ लागून आज हा गुन्हा दाखल झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com