खंडणीखोर बऱ्हाटे राजकीय कार्यकर्त्याच्या घरी पुण्यातच राहात होता - The ransom barhate was living in Pune at house of political worker | Politics Marathi News - Sarkarnama

खंडणीखोर बऱ्हाटे राजकीय कार्यकर्त्याच्या घरी पुण्यातच राहात होता

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

विशेष म्हणजे हा कार्यकर्ता एका राजकीय पक्षाच्या कायदा सेलचा पदाधिकारी आहे.

पुणे : गेली सुमारे सहा-आठ महिने पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला खंडणीखोर रवींद्र बऱ्हाटे (ravindra barhate) याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची (pune police) कितीतरी पथके विविध राज्यात फिरत होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार बऱ्हाटे हा पुण्यातच आळंदी रस्त्यावर एका राजकीय कार्यकर्त्याच्या आश्रयाला होता असे आता उघडकीस आले आहे.(he ransom barhate was living in Pune at house of political worker) 

विशेष म्हणजे हा कार्यकर्ता एका राजकीय पक्षाच्या कायदा सेलचा पदाधिकारी आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत. तपासासाठी या कार्यकर्त्याच्या घरी मंगळवारी पोलिसांचा ताफा पोचल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना बऱ्हाटे इतके महिने आपल्याच परिसरात राहात असल्याचे लक्षात आल्यानंतर धक्का बसला. ही बातमी आज सकाळी या भागात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी बऱ्हाटे याला अटक केली असली तरी तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्हाटे याची पत्नी व मुलाला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो स्वत: पोलिसांकडे हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा-आठ महिन्यांच्या काळात बऱ्हाटे हा पुण्यातच आळंदी रस्त्यावर एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरी आश्रयाला होता असे समोर आले आहे. बऱ्हाटेला अटक केल्यानंतर अधिक चौकशीसाठी पोलीस आळंदी रस्त्यावरील या राजकीय कार्यकर्त्याच्या घरी पोचल्यानंतर बऱ्हाटे या भागात राहात असल्याचे नागरीकांच्या लक्षात आले. 

दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी हा राजकीय कार्यकर्ता आता घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे सहा-आठ महिन्यानंतर पुणे पोलिसांना बऱ्हाटेचा शोध लागला. मात्र, इतके दिवस पुण्यात असूनही पोलिसांना तो सापडत नव्हता याबद्दल आश्‍यर्च व्यक्त करण्यात येत आहे. बऱ्हाटेच्या शोधासाठी विविध राज्यांमध्ये पुणे पोलिसांची पथके शोध घेत होती. मात्र, पोलिसांच्या नाकावर टिच्चून बऱ्हाटे पुण्यातच आरामात राहात होता. पुण्यातच सलगपणे राहिलेला बऱ्हाटे पोलिसांना सापडत नव्हता हे विशेष. बऱ्हाटेसह त्याच्यासोबत असलेल्या इतर सर्वांना पोलिसांनी मोका लावला असून त्या सर्वांची रवानगी सध्या येरवडा कारगृहात करण्यात आली आहे. 
Edited By : Umesh Ghongade
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख