आप्पासाहेब जगदाळेंशी लढणार कोण... निंबाळकर की सपकळ?

इंदापूरची जागा बिनविरोध होणार नसल्याची चिन्हे.
Ranjit Nimbalkar, Bhausaheb Sapkal
Ranjit Nimbalkar, Bhausaheb Sapkalsarkarnama

वालचंदनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Pune District Bank Election) इंदापूरात चुरस पाह्यला मिळत आहे. तालुक्यातून 'अ' वर्गाच्या जागेसाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. रणजित निंबाळकर व माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करुन त्यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर सारखे दिग्गज नेते असताना देखील तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या.

Ranjit Nimbalkar, Bhausaheb Sapkal
जिल्हा बॅंकेसाठी अजितदादांचा अर्ज; दुसऱ्या नावाची उत्सुकता!

बॅंकेचे विद्यामान संचालक आप्पासाहेब जगदाळे हे सोमवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्याशी निबांळकर किंवा सपकाळ यांची लढत होण्याची शक्यता आहे. कर्मयोगी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून राष्ट्रवादी काँग्रेसने काढता पाय घेतल्याची चर्चा जोरदार सुरु होती. राष्ट्रवादीने दोन्ही कारखान्याची निवडणूक न लढविल्यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते. जिल्हा बॅंकेची निवडणूक राष्ट्रवादी लढविणार का? याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा बॅंकेच्या 'अ' वर्गातील निवडणुकीसाठी १८३ मतदार आहेत. बॅंकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बॅंकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलमधून निवडणूक लढवली होती.

या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जगदाळे यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्याचे टाळून निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला. या वेळी निवडणूकीमध्ये आप्पासाहेब जगदाळे व हर्षवर्धन पाटील एकत्र असून दोघांची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ताकद वाढली असल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे. बुधवारी (ता.१) रोजी भरणे यांनी 'ब' वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इंदापूर तालुक्यातून 'अ' वर्गातून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज छत्रपती कारखान्याचे संचालक व सणसरचे सरपंच अॅड. रणजित निंबाळकर व छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. त्यामुळे इंदापूरची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ranjit Nimbalkar, Bhausaheb Sapkal
राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; ठाण्यातील बड्या नेत्याने बांधले घड्याळ

उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या सुचनेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे निंबाळकर व सपकळ यांनी सांगितले. ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २३ डिसेंबर रोजी अंतीम यादी प्रसिद्ध होणार असून २ जानेवारी २०२२ रोजी मतदान व ४ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in