विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल

साताऱ्यात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीची खलबत चालू आहेत.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

पुणे : साताऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणूकीची खलबत चालू असतानाच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मुत्रसंसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत.

रामराजे नाईक निंबाळकर काल पंढरपूर पालखी मार्गाच्या चौपदरीकरण सोहळ्याला उपस्थित होते. त्यानंतर त्यांची जिल्हा बँकांच्या निवडणूकांची खलबत सुरु झाली होती. त्याचा भाग म्हणून त्यांच्या साताऱ्यात काही बैठकाही पार पडल्या. यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत बंद दाराआड बैठक पार पडली होती. तसेच कालच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये घरी जावून त्यांची भेट घेतली होती. सुत्रांच्या माहितीनुसार यात दिवाळीच्या शुभेच्छा आणि जिल्हा बँकेच्या निवडणूकांची चर्चा पार पडली.

Ramraje Naik Nimbalkar
सातारा जिल्ह्यात २०५ नगरसेवक होणार, नवीन शासन निर्णयामुळे इच्छुकांना लॉटरी

मात्र रामराजे यांना रात्रीच्या सुमारास मुत्रसंसर्गाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना आता पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com