Ramdas Athawale : आठवलेंचं ठरलं! शिर्डीतून पुन्हा खासदारकीसाठी शड्डू ठोकणार, भाजपशीही झाली चर्चा!

Shirdi Loksabha : शिवसेना भाजपच्या जागावाटपात गरज पडल्यास मध्यस्थी करणार..
Ramdas Athawale :
Ramdas Athawale :Sarkarnama

Ramdas Athawale : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्रातल्या (Lok Sabha Election) शिर्डी लोकसभा मतदार संघातून स्वत: निवडणूक लढणार आहोत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. याबाबतीत प्राथमिक स्तरावरची चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्याशी झालेली आहे. तसेच राज्यातल्या आणखी दोन लोकसभेच्या जागा आरपीआय लढवेल, असे त्यांनी सांगितले. (Ramdas athawale statement about lok sabha election nashik news)

Ramdas Athawale :
Nana Patole : देवेंद्र माझे भाऊ; अमृता आमच्या लहान सूनबाई आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोललं तर...

आरपीआयमुळे भाजपला एकूणच संपूर्ण देशभरात फायदा झाल्याचे दिसते. यामुळे केंद्रात मंत्रिपदाप्रमाणे, राज्यातही विधानसभेवेळी १५ जागा व दोन मंत्रिपदे अन् एका महामंडळाची मागणी आपल्या पक्षाची असल्याचे, आठवले म्हणाले.

गोल्फ क्लब येथे शासकीय विश्रामगृहावर आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "२०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच सत्ता येईल. काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान कधी होऊ शकत नाही. विरोधक सर्वच पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा असल्याचे, आठवलेंनी मिश्किल टिपण्णी केली.

Ramdas Athawale :
Ramdas Kadam : मरगळलेली नाही, तर सच्च्या शिवसैनिकांची जिवंत सभा असेल; आमदार कदमांचं ठाकरेंना आव्हान..

भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ पन्नास जागा देणार असल्याचे विधान केले होते. यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता. यावर बेोलताना आठवले म्हणाले, बावनकुळेंचे ते मत असू शकते. महायुतीत जागा वाटपाबाबत सर्वांशी चर्चा केली जाईल. यातून शिवसेनेची नाराजी दूर होईलच. आवश्यकता असल्यास यात आपण स्वत: पुढाकार घेऊ तिढा सोडवू, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com