संकटात सापडलेल्या राज्यपालांसाठी रामदास आठवले मैदानात; म्हणाले...

Ramdas Athawale : राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपमान करणं योग्य नाही.
Bhagat Singh Koshyari, Ramdas Athawale, Latest News
Bhagat Singh Koshyari, Ramdas Athawale, Latest NewsSarkarnama

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चांगलेच अडचणीत आले आहे. या वक्तव्यानंतर राज्यपालांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आठवलेंनी राज्यपालांना मोलाचा सल्ला देतानाच विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आठवले यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला.(Bhagat Singh Koshyari, Ramdas Athawale, Latest News)

Bhagat Singh Koshyari, Ramdas Athawale, Latest News
बैलगाडा शर्यत पुन्हा अडकली कायद्याच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

आठवले म्हणाले, '' राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, त्यांनी अशी विधानं करणं टाळलं पाहिजे. मात्र, त्यांच्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं राजकीय आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपमान करणं योग्य नाही. आणि राज्यपालांनी सांगितलं आहे, यापुढे ते आता कमी बोलणार आहेत. त्यामुळे आता त्यांनी अशाप्रकारची वक्तव्य टाळायला हवीत. त्यांनी कुणाच्या भावना दुखावणारी वक्तव्य राज्यपाल म्हणून करू नये.''

Bhagat Singh Koshyari, Ramdas Athawale, Latest News
गांधी हत्येसाठी काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्यानेच पिस्तूल पुरवला; सावरकर-गांधींच्या पणतूंमध्ये जुंपली

छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे अशी स्पष्ट भूमिका आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले होते ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे, तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हांला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com