राज्यसभा निवडणूक; कॉंग्रेसच्या भूमिकेने शिवसेनेचीच होणार कोंडी ?

अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
राज्यसभा निवडणूक; कॉंग्रेसच्या भूमिकेने शिवसेनेचीच होणार कोंडी ?
Rajya Sabha Election Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली असताना आठ अपक्ष आणि लहान पक्ष यांच्या मतदानावर सध्या राज्यसभेची गणिते अवलंबून आहेत. त्यातच काँग्रेसने त्यांचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी ४२ मतांच्या ऐवजी ४४ मतांचा सुरक्षित कोटा देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजते. असे झाले तर काँग्रेसचा एकही आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करणार नाही हे निश्चित आहे.

Rajya Sabha Election
प्रवक्त्यांमुळेच भाजप अडचणीत; दोघांना पक्षातून तडकाफडकी केलं निलंबित

अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला आठ अपक्ष आणि दहा छोटे पक्ष यांच्या आमदारांचा पाठिंबा असला तरी या अठरा मतांवरच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची विजयी पताका फडकणार की फाटणार हे ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा असलेल्या बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे जाहीर करत शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य अनिश्चित असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा सरकारला असला तरी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला हा पाठिंबा मिळेल की नाही यावर राजकीय तर्क सुरू झाले आहेत.

Rajya Sabha Election
राज्यसभेसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीचा 'हात' सोडला? पवारांसाठी दिल्लीची वाट बिकट

काँग्रेसकडे केवळ ४४ आमदार असून सुरक्षित विजयी होण्यासाठी अतिरिक्त दोन मतांचा कोटा जर इम्रान प्रतापगडी यांना दिला तर मात्र शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना काँग्रेसच्या एकाही मताचा फायदा होणार नाही हे निश्चित आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अपक्ष आठ आणि लहान पक्षाचे तीन अशा आमदारांच्या भोवती महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करण्याची खेळी आणि रणनीती आखल्याची माहिती आहे.

नेहमी तटस्थ राहणारा ‘एमआयएम’ हा पक्षदेखील यावेळी मतदानामध्ये सहभाग घेईल, असे समजते. उत्तर प्रदेशमधून आयात केलेले इम्रान प्रतापगडी यांच्यासारख्या युवा मुस्लिम तरुणाला मतदान करण्याची जाहीर भूमिका ‘ एमआयएम’ घेण्याची शक्यता आहे. पक्षाने काँग्रेसच्या बाजूने मतदानाची भूमिका घेतली तरी त्यांचे मतदान काँग्रेसच्या प्रवक्त्याला दाखवणे बंधनकारक नसेल. पण ‘एमआयएम’ ने प्रतापगडी यांना पाठिंबा जाहीर केला तर हिंदुत्वाच्या मुद्यावर महाविकास आघाडीची कोंडी करणे भाजपला शक्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in