
मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) १० जून रोजी होणार आहे. राज्यात २४ वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने जोरदार तयारी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत एकही मत वाया जाऊ नये,म्हणून सर्वच पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
भाजपच्या दोन आमदारांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना मतदानासाठी कसे आणायचे, असा प्रश्न भाजपसमोर होता. पण या दोन्ही आमदारांना विधानभवनात आणण्याची तयारी भाजपने केली आहे.
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (laxman jagtap) आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. जगताप यांना एअर अँम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार आहे, तर टिळक या सध्या मुंबईतच आहे. या दोघांना मतदानासाठी आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. व्हीलचेअर वरून हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार असल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.
कोरोना लागण झाल्याने सक्तीचे विलगीकरण, न्यायालयीन कोठडीतील लोकप्रतिनिधींना मतदानास कायद्याची मनाई आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लोकप्रतिनिधी अशा विविध समस्यांनी १० जून रोजी होत असलेल्या राज्यसभेच्या मतदानाला ग्रासले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे दोन माजी-आजी मंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या कारागृहात आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर बुधवारी (ता.८) सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आज (गुरुवार) त्यावर निर्णय होणार आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल झाले आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानगीला ईडीने (ED)विरोध दर्शवला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.