शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा; उद्धव ठाकरेंनाच लिहिले पत्र...

शिवसेनेतील (shivsena) अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत
Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या गटात गेले. तसेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. पुण्यातील (Pune) शिवसेनेचे (ShivSena) पदाधिकारी असलेल्या विटकर यांनी धक्कादायक खुलासा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केला आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
राऊतांना शिव्या देऊ नका, सत्ता येण्यात त्यांचा वाटा मोठा ; फडणवीसांचा टोमणा

शिवसेनेचे झोपडपट्टी विभागाचे प्रमुख राजू विटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, आपल्या न कळत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील करून फसवणूक झाल्याचे स्पष्टीकरण विटकर यांनी केले आहे. या पत्राची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामध्ये विटकर यांचाही प्रवेश करण्यात आला होता. मात्र, हे नकळत झाल्याची कबुली विटकर यांनी दिली आहे. मला पुन्हा शिवसेनेत सहभागी करून घ्या, असा देखील उल्लेख पत्रात त्यांनी केला आहे. "चूक झाली, त्याबद्दल मी माफी मागतो", असे विटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

विटकर म्हणाले, मी गेली ३० वर्ष शिवसेना पक्षामध्ये काम करत आहे. माझी फसवणूक झाली आहे. तरी मला पुन्हा पक्षात घ्यावे. मी नीलम गोर्हे व सचिन अहिर यांच्या नेतृत्वात पुन्हा काम करणार असल्याचे विटकर यांनी सांगितले.

Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
पक्षात फूट पडत असताना उद्धव ठाकरे काय करत होते? देणार सर्व प्रश्नांची उत्तरे!

विटकर यांच्या पत्रामुळे शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना ४० आमदार आणि १२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. तसचे अनेक महापालिकेतील माजी नगरसेवकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक पदाधिकारीही त्यांच्या गटात सहभागी होत आहेत. मात्र, विटकर यांच्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

दरम्यान, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या 'निष्ठा' यात्रेमध्ये ते बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. मात्र, ज्यांना परत यायचे आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे आणि 'मातोश्री'चे दरवाजे उघडे असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in