भोंग्या पेक्षा कांदें-बटाट्याचे भाव महत्वाचे; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितले...

ज्या राज्यकर्त्यांचा शेतीशी संबध नाही त्यांनी माणुसकी म्हणुन तरी शेतकऱ्याकडे पाहिले पाहिजे.
Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Shetti Latest News Updates
Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Shetti Latest News UpdatesSarkarnama

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंगा आणि मंदिरावरून चाललेल्या राजकारणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपला (BJP) चांगलेच सुनावले आहे.

आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे सातगाव पठार भागातील शेतक-यांचा शेतकरी मेळावा आणि बटाटा परिषदेचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Shetti Latest News Updates)

Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Shetti Latest News Updates
'ते' ट्विट देवेंद्रजींनी वाचलं तर त्यांनाही प्रश्न पडेल की माझ्या बायकोचं काय चाललंय!

शेट्टी म्हणाले, राज्यातील शेतक-यांसाठी भोंगा, मंदिर, मशिदींवर वाजतो हा प्रश्न महत्वाचा नसुन कांदा-बटाट्याला बाजारभाव नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेयं तर दुसरीकडे ऊसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त असताना ज्या राज्यकर्त्यांचा शेतीशी संबध नसला तरी माणुसकी म्हणुन शेतकऱ्याकडे पाहिले पाहिजे. मात्र, दुर्दैव सत्ताधारी आणि विरोधक दोघेही शेतक-यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडुन इतर प्रश्नांनाचं महत्व देत असल्याची टीका शेट्टींनी करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

देशात आघाडी करणा-यांनी आम्ही जनसामान्यांसाठी आहोत त्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय मागे हटणार नाही, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करावा. मात्र, दुदैवाने असं होत नाही, असे म्हणत तिस-या आघाडीचे नेतृत्व उभं करणा-यांवरही शेट्टींनी खोचक शब्दात निशाणा साधला. तर कांदा बटाट्याला बाजारभाव मिळत नसल्याची अनेक दिवसांची तक्रार शेतकरी करतोय मात्र, शेतक-यांना तेजी-मंदीचा फायदाही घ्यायला हवा. बटाट्याला पर्याय म्हणुन सोयाबीन विचार शेतक-यांनी करावा, असे आवाहनही शेट्टींनी शेतक-यांना यावेळी केलं.

Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Shetti Latest News Updates
महाविकास आघाडी भक्कम; तरीही भांड्याला भांडे लागणारच...अजित पवार

शेतमालाच्या हमी देण्यात सरकार अपयशी ठरतयं त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय राज्यात वेफरसाठी लागणारा बटाटा पुण्याच्या सातगाव पठार परिसरात उत्पादित केला जातो. मात्र मेहनत आणि कष्ट करुन शेतकरी तोट्यातच चालला असेल तर सातगाव पठार भागातील शेतक-यांनी बटाटा कंपन्यांना बटाटा देणं बद करावं. नाक दाबलं की तोंड उघडतं म्हणुन शेतक-यांनी संघटीत व्हायला हवं. कंपन्या शेतक-यांसमोर झुकतील, अशा शब्दात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणा-या कंपन्यांच्या विरोधातही शेट्टींनी यावेळी रंगशिंग फुंकले

दरम्यान, केतकी चितळेंनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत राजु शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. कुनाच्याही व्यंगचित्र, आजारावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. ही संस्कृती नाही, असे म्हणत केतकीवर त्यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com