Rajmata Ahilya Devi Holkar Birth Anniversary : अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर देशाच्या राजधानीत घुमणार !

RSP News : रासपच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंतीचे नवी दिल्लीत आयोजन
Ahilya Devi Holkar
Ahilya Devi HolkarSarkarnama

Birth Anniversary of Rajmata Ahilya Devi Holkar : महाराष्ट्रात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ही जयंती राष्ट्रीय स्तरावर यंदा प्रथमच साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने पुढाकार घेतला आहे. या जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर यंदा प्रथमच देशाच्या राजधानीत घुमणार असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर (Rajmata Ahilya Devi Holkar) यांची २९८ वी जयंती यंदा नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा खरा परिचय देश पातळीवर करून देण्याच्या उद्देशाने या कार्यकर्माचे आयोजन केले आहे. हा जयंती कार्यक्रम नवी दिल्लीतील श्री सत्य साई ऑडोटोरियम येथे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) व पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी माहिती दिली.

Ahilya Devi Holkar
Satara News : सदाभाऊंचा महामार्गावरच ठिय्या, अन॒ पोलिसांची तारांबळ...

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) असणार आहेत. यावेळी राज्यसभेचे खासदार पी. विल्सन, आग्रा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रबल प्रताप सिंह, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. विश्वनाथ, तेलंगणा विधानपरिषद सदस्य येगे मल्लेश्याम, गुजरातचे माजी खासदार सागर राईका, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभारी रामकुमार पाल, रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर आदी उपस्थित राहणार आहेत.

Ahilya Devi Holkar
Vajramuth Sabha : ठरलं ! वज्रमूठ सभांचा धडाका होणार सुरू; पहिली सभा पुण्यात..
Invitation Letter
Invitation LetterSarkarnama

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती प्रथमच नवी दिल्ली येथे होत आहे. यामुळे अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर देशाच्या राजधानीत घुमणार आहे. यशवंत सेनेच्या माध्यमातून प्रथम चौंडी येथे जयंती साजरी केली जात आहे. त्यानंतर मुंबई व आता दिल्ली येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे. या जंयतीला पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रासपचे (RSP) पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com