Raj Thackeray : राज ठाकरेंची नवी ऑफर; राजकारणात येण्याची इच्छा असेल तर मला भेटा...

Raj Thackeray : 'राजकारणासाठी वारसा वैगेरे काही लागत नाही'
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

''राजकारण म्हणजे निवडणुका नव्हे, तर राजकारणात विविध अंग असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण मुला-मुलींनी फक्त घरात बसून न राहता राजकारणात यायला हवं. राजकारणासाठी वारसा वैगेरे काही लागत नाही''.

''काहीही वारसा नसताना राजकारणात यशस्वी होता येतं. त्यामुळे जर खरंच राजकारणात येण्याची कोणाची इच्छा असेल तर जरूर मला येवून भेटा'', अशी थेट ऑफरच राजकारणात येणाऱ्या तरुण मुला-मुलींना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ते आज पुण्यातील आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, ''१९९५ च्या आगोदरचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र कसा आहे यावर लेख लिहावासा वाटतो. ९५ पूर्वी महाराष्ट्रात काही नव्हतं. याबाबत पुण्यातील लोकांनी याबाबत माहिती घ्यावी. कारण एका पुण्याचं आता चार पुण्यात रुपांतर झालं आहे. सध्या पुणे कुठल्या कुठे पसरलं आहे. पण हे मी का सांगतोय आणि या आधी देखील मी माझ्या भाषणांतून सांगितलं आहे. मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला. मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही'', असं ते यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Shivsena : नड्डा येऊ द्या, नाहीतर मोदी ; औरंगाबादचा खासदार उद्धव ठाकरे ठरवतील तोच..

''वेगाने आपल्याला पुढे आणलं आहे. त्यामुळे राजकारणासह सर्वच बदललं. हा बदल गरजेचा आहे. मात्र आपल्या जीवावर उठणार असेल तर तो बदल काय कामाचा? १९९५नंतर सगळं बदलत गेलं आहे. त्यानंत मुलं परदेशात जायला लागली आणि ते राजकारणापासून बाजूला झाले. पण राजकारणाला ज्याची गरच आहे तोच युवा वर्ग राजकारणाला तुच्छ मानायला लागला आहे'', असं म्हणत राज ठाकरेंनी बदलत्या राजकारणावर भाष्य केलं.

Raj Thackeray
Anil Deshmukh : अनिल देशमुख जेलबाहेर येताच पत्नीला रडू कोसळले...

''सध्या विधानसभेतील कोणाचेच भाषण ऐकायची इच्छा होत नाही. कारण सर्व मुळ प्रश्न मागे पडलेत. विधानसभेत फक्त एकमेकांवर टीका केली जाते. पण मुळ प्रश्न विचारायचा पाहिजेत. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात सहभाग घ्यायला हवा. राजकारणासाठी वारसा वैगेरे काही लागत नाही. राजकारणामध्ये काहीही वारसा नसताना अनेकजण यशस्वी देखील झालेले आहेत, त्यामुळे अनेक मुला-मुलींनी राजकारणात आलं पाहिजे'', असं ते म्हणाले.

Raj Thackeray
Aimim : सत्तार अडचणीत असतांना देसाईंवर घोटाळ्याचे आरोप ? काय टायमिंग आहे..

''महाराष्ट्रातील तरुण मुला-मुलींनी फक्त घरात बसून राहू नका. राजकारण म्हणजे निवडणुका नव्हे, राजकारणात विविध अंग असतात. आपली जर खरचं कोणाची इच्छा असेल माझी तर आहेच तरुण मुला-मुलींनी राजकारणात यावं. आपली कोणाची जर खरचं राजकारणात येण्याची इच्छा असेल तर जरूर मला येवून भेटा. मी तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे'', अशी थेट ऑफरच राजकारणात येण्याऱ्या तरुणांना राज ठाकरे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com